Homeराज्यनिलघोड्याच्या हल्ल्यात वनकर्मचारी गंभीर जखमी...

निलघोड्याच्या हल्ल्यात वनकर्मचारी गंभीर जखमी…

रामटेक – राजु कापसे

वनविभागाच्या मृगविहारातील वन्यप्राण्यांना चारा देत असतांना अचानकपणे एका निलघोड्याने हल्ला चढवित वनकर्मचाऱ्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच ३० मे ला घडली. देविदास उमराव चौधरी ( ५५ ) वनविभाग रामटेक असे वनकर्मचाऱ्याचे नाव असुन तो दि. ३० मे ला सकाळी ८ वाजता दरम्यान रामटेक येथील अंबाळा वळणावर असलेल्या वनविभागाच्या मृगविहार येथे वन्यप्राण्यांना चारा देण्यासाठी गेलेला होता.

चारा देत असतांनाच एका निलघोड्याने देविदासवर हल्ला चढवित त्याला उचलुन फेकले. यात निलघोड्याचे शिंग देवीदासच्या मांडीत खुपसले व उचलुन फेकल्यावर खाली आदळल्याने कमरेला दुखापत झाली. लागलीच त्याला नागपुर येथील विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे देविदासवर शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज सादर करण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments