Homeराज्यरोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट् गव्हर्नर रो.राजेंन्द्र भामरे यांची आकोट रोटरी नेत्र रुग्णालयाला भेट...

रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट् गव्हर्नर रो.राजेंन्द्र भामरे यांची आकोट रोटरी नेत्र रुग्णालयाला भेट…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरात रोटरीच्या वतीने ने गत 20 वर्षापासुन नेत्र रुग्णालय कार्यरत असुन अनेक गरीब रुग्णांना त्याचा आजही फायदा होत आहे. रोटरीचे माजी डिस्ट्रीक्ट् गर्व्हनर राजेंन्द्र् भामरे हे 19-20 मध्ये डिस्ट्रिक्ट गर्व्हनर होते. त्यांचे कार्यकाळात अकोट रोटरी नेत्र रुग्णालयात डोळे तपासणी करीता लागणारी व्हीजन ड्रम सह चेअर युनिट त्यांनी पुरस्कृत केले होते. वेळोवेळी त्यानी या नेत्र रुग्णालया करीता मदत केलेली होती.

आताही त्यानी या रुग्णालयातील गरजा माहित करवून घेण्यासाठी रुग्णालयाला भेट दिली. हयावेळी रुग्णालयाच्या प्रगती करीता वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हया भेटीत रुग्णालयाला मोबाईल आय चेक अप व्हॅनची तथा इतर इंस्ट्रुमेंटची आवश्यकता असल्याची बाब लक्षात येताच त्यांनी ह्या सर्व गोष्टी ग्लोबल ग्रॅंड मार्फत देण्याचे आश्वासन दिले.त्यांची ही भेट अकोट रोटरी नेत्र रुग्णालया करीता फायदयाची ठरणार आहे.

त्यांच्या सोबत नाना बच्छाव मालेगांव हे उपस्थीत होते. हया वेळी त्यांचे सर्व रोटरी सदस्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हया वेळी रोटरी चारीटेबल ट्र्स्ट् चे अध्यक्ष प्रभाकरराव मानकर सचिव राजकुमार गांधी माजी अध्यक्ष् दिलीप चावडा , अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार संजय बोरोडे, सचिव माधव काळे, सदस्य् आनंद भोरे उपस्थीत होते .अशी माहीती रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे यानी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments