नांदेड – महेंद्र गायकवाड
देशातील प्रसिद्ध देवस्थान श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी महाराष्ट्र शासनाने माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांची निवड केल्यानंतर आज त्यांनी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन पदभार स्वीकारला. तदनंतर लगेचच त्यांनी ट्रस्टच्या रुग्णालयाची पाहणी करून दैनंदिन कामकाजाचा आढावा घेतला.
पदभार स्वीकारल्यानंतर संस्थानच्या कार्यालयात सत्कार समारंभ पार पडला. मंदिर ट्रस्ट चे प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे व शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चौगुले यांनी सवंतांचा विशेष सत्कार केला. यावेळी नांदेडच्या पदाधिकाऱ्यांची व सावंतांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. साईबाबाचे आणि माझे नाते शालेय जीवनापासून आहे. मुंबईत माझ्या शाळेलगत साईधाम हे साईचे मंदिर असल्यामुळे मी दररोज दर्शन घेऊनच शाळेत जायचो.
तदनंतर वीस वर्षांपूर्वी डॉ. शंकरराव चव्हाणांनी संस्थानवर माझी शिफारस केली होती. आणि आता मला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिफारशीने साईंची व ट्रस्ट च्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून मी चव्हाण व थोरतांचे आभार मानून नक्कीच या संधीच सोनं करत समर्पित होऊन निस्वार्थ काम करेल, अशा भावना डी. पी. सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना केल्या.
याप्रसंगी नांदेडच्या महापौर जयश्री पावडे, निलेश पावडे, शिवाजीराव पावडे, राजेश पावडे, गंगाधरराव कदम, दीपक पाटील, नागोराव आढाव, प्रफुल सावंत, विठ्ठल पावडे, सुखदेव जाधव, रेखा पाटील चव्हाण, संतोष मुळे, श्याम कोकाटे, कविता मुळे, सरिता बिरकले, अपूर्व देशमुख, दीपक पाटील, भालचंद्र पवळे, अतुल वाघ, भास्कर जनकवाडे, केशवराव शेजुळे,
गोविंदराव आढाव, मुंजाजी घोगरे, नवनाथराव सूर्यवंशी, प्रल्हाद जोगदंड, सत्यजित भोसले, आदित्य तेवढे लहानकर, विवेक राऊतखेडकर, सतीश बस्वदे, अजिंक्य पवार, सय्यद नौशाद, राहूल देशमुख, शेख अजीज, सचिन संत्रे, मूनवर शेख, राजू धाडवे, जेसीका शिंदे, नसीम पठाण, हेमा पाटील, हंसराज काटकांबळे, नागेश सुलगेकर आदींची उपस्थिती होती.