Homeराजकीयमाजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचा विरोधकांना इशारा...

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत यांचा विरोधकांना इशारा…

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून अलिप्त होईन…माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत,

कणेरीवाडी तालुका करवीर येथील ग्रामपंचायत मध्ये जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या भावाची पत्नी शोभा खोत या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंच शोभा खोत यांनी 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतच्या गटार कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी गटातील लोकांनी केला आहे. याला उत्तर देण्यासाठी आज शशिकांत खोत यांनी कणेरीवाडी ग्रामपंचायत मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपल्या गटातील सरपंच व सदस्यांनी कोणते प्रकारचा गैरप्रकार अथवा भ्रष्टाचार केलेला नाही याची पुरावे सुद्धा त्यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळी शशिकांत खोत यांनी पत्रकारांना देऊन यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आढळल्यासआपण राजकारणातुन निवृत्ती घेऊ असे ते यावेळी म्हणाले.

सरपंच शोभा खोत यांनी या आरोपांना उत्तर देताना गेली साडेचार वर्षे कणेरीवाडी गावचे सरपंच पद सांभाळत असताना या काळामध्ये माजी मंत्री सतेज पाटील व कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील तसेच या विभागाच्या जि. प. सदस्या सरिता खोत या सगळ्यांच्या माध्यमातून गावामध्ये चार ते पाच कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण केली आहेत. विरोधकांनी माझ्या विरोधात बिन बुडाचे आरोप केले आहेत .यामध्ये 14 वित्त आयोग आराखड्यामध्ये अनु. नंबर7 मध्ये रघुनाथ वाईंगडे घर ते महेश देसाई घर येथे गटर करणे हे काम आहे. या कामासाठी वित्त आयोग मधून प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाला.

त्या अगोदर सदर कामासाठी आमदार फंडातून उपलब्ध निधी झाल्याने ते काम आमदार फंडातून करण्यात आले .त्यामुळे सदरच्या कामाऐवजी आराखड्यातील अनुक्रमांक आठ नंबरचे काम सिद्धिविनायक नगर येथे गटर करणे हे टेंडर काढून शासन नियमाप्रमाणे पूर्ण केले आहे. 14 वा वित्त आयोग असो किंवा ग्रामपंचायत फंड असो यामधून रघुनाथ वाईंगडे घर ते देसाई घर येथे गटर करणे या कामाचे कोणते प्रकारचे टेंडर अथवा कोणत्याही प्रकारचे बिल अदा केलेले नाही. यासाठी आपण सदर कामाची निपक्षपातीपणे चौकशी होऊन चुकीचे आरोप करणाऱ्या वर कायदेशीर चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे सरपंच शोभा खोत यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार बैठकीला ग्रामपंचायत सदस्य कृष्णात खोत, संदीप शेळके, तुषार कांबळे, निलाबाई शेळके, बाळाबाई खोत, दिपाली कदम, सुप्रिया खोत अरुण मोरे , तर कणेरीवाडी विकास सेवा संस्था चेअरमन आप्पासो मोरे, महादेव भोसले, सदस्य महादेव खोत ,पांडुरंग खोत ,संभाजी मोरे, अमोल शेळके, दत्तात्रेय माने ,राजाराम कदम ,श्रीपती खोत विश्वनाथ वारके, रंजना वाठारकर, सुधा खोत उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments