पातूर येथे भव्य पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराला जिल्ह्यातून दिव्यांग यांची मोठ्या संख्येने नोंद…
पातूर – निशांत गवई
शहर व ग्रामीण भागातील असंख्य दिव्यांग यांना कृत्रिम अवयव व साहाय्यभूत साधने मिळवण्या करिता पातुर बाळापुर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय योजने अंतर्गत दिव्यांगांना दिलासा देत आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय योजना आपल्या तालुक्यात व जिल्ह्यातील अनेक दिव्यांग हे आर्थिक परिस्थितीने कमजोर असल्याने जन्मताच मिळालेले अपंगत्वावर वर मात करत आपलं जीवन सामान्य नागरिकांन प्रमाणे जगण्याची जिज्ञासा अंगी बाळगून नेहमी अपंगावर मात करण्याची क्षमता ठेवत दिव्यांग,
त्यांचे नातेवाईक ईश्वराशी भांडत असतात परंतु शासकीय योजना ह्या सर्वसामान्य जनतेकरिता राबविण्याकरिता आमदार नितीन देशमुख व त्यांचे सहकारी यांनी शासकीय योजना आपल्या तालुक्यात खेचून आणून पातूर तालुका व जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे शिबिराच्या माध्यमातून केले आहे या शिबिरामध्ये अपंग दिव्यांग व त्यांचे नातेवाईक मोठ्या हिरिरीने उपस्थित राहून नोंदणी केल्या,
त्यावेळी हे शिबिर उत्कृष्ट रित्या पार पाडण्याकरिता पाचोरा येथील शिवसेना गटनेते शहर प्रमुख अजय ढोणे व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ मनिषा ढोणे, अनिल निमकंडे ,आनंद तायडे, बंडू देवकर, अंबादास देवकर, संतोष राऊत, प्रमोद हाडके,सोपान वानखडे, दिनेश गिरे, सचिन तायडे विजय हिरडकर, सचिन गिरे, संतोष इंगळे, प्रमोद इंगळे गणेश बुलबुले,प.स. सदस्य गोपाल ढोरे, संतोष सरदार व यांनी परिश्रम घेतले.