Friday, April 26, 2024
Homeराज्यमुंबईतील अपेक्स हॉस्पिटलतर्फे गोवर आजारासाठी मोफत इ-ओपीडी पहिल्या खाजगी हॉस्पिटलचा लहान मुलांसाठी...

मुंबईतील अपेक्स हॉस्पिटलतर्फे गोवर आजारासाठी मोफत इ-ओपीडी पहिल्या खाजगी हॉस्पिटलचा लहान मुलांसाठी पुढाकार…

Share

मुंबई – सध्या मुंबईत गोवर आजाराची साथ प्रचंड वेगाने पसरत आहे. शहरात गेले अनेक दिवसात गोवर आजाराचे अनेक रुग्ण आढळले आहेत. हा आजार विशेषतः लहान मुलांमध्ये आढळून येतो. सरकार युध्दपातळीवर काम करत आहे. सामाजिक कर्तव्य म्हणुन अपेक्स ग्रुप ऑफ़ हॉस्पिटल ज्यांची मुंबईत अत्याधुनिक वैदकीय सुविधानी सुसज्ज असलेली पाच हॉस्पिटल्स आहेत, यांनी मुंबईमध्ये गोवर आजारा संबंधित माहिती व प्रथमोपचारासाठी इ – ओपीडी सुरु केली आहे.

ज्या लोकांना आपल्या अपत्यामध्ये काही गोबर सदृश्य लक्षण आढळल्यास ,त्यांनी इ – ओपीडी ९१३६६६ ५१०५ व ९१३६६६ ३५०५ या क्रमांकांवर फ़ोन करून डॉक्टरांबरोबर संपर्क साधावा. सदर इ – ओपीडी च्या माध्यमांतून अपेक्स ग्रुप ऑफ़ हॉस्पिटलचे डॉक्टर गोवर संबंधीत मार्गदर्शन करतील. लोकांच्या मदतीसाठी अपेक्स ग्रुप ऑफ़ हॉस्पिटल सदैव तयार आहे. आणि गरज पडल्यास आम्ही आमच्या युनिट्समध्ये वेगळा वार्ड सुरु करू अशी माहिती अपेक्स ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे मुख्य मार्केटिंग अधिकारी निखिल जाधव यांनी दिली आहे.

मुंबईत गोवरची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान १०९ रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात मुंबईत या साथीचे ६० रुग्ण सापडले होते. तर काही दिवसांपूर्वीच मुंबई गोवंडीमधील एकाच कुटुंबाटील तीन बालकांचा या गोवरच्या साथीने मृत्यू झाला होता.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: