Friday, March 29, 2024
Homeगुन्हेगारीगडचिरोली | वेडमपल्ली नजीक पोलीस-नक्षल्यामंध्ये चकमक...पोलिसांच्या सी-60 पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून...

गडचिरोली | वेडमपल्ली नजीक पोलीस-नक्षल्यामंध्ये चकमक…पोलिसांच्या सी-60 पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला…

Share

गडचिरोली : 16 जानेवारी

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला आहे. नक्षलविरोधी अभियानादरम्यान अहेरी तालुक्यातील पेरमीली हद्दीत येणाऱ्या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमकस्थळावरून एक पिस्तुल, भरमार बंदुकीसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.

रविवारी अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगल परिसरात दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दडून बसलेल्या २० ते २५ नक्षल्यांनी पोलिसांच्या विशेष पथकावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. दरम्यान पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. यावेळी चकमकस्थळी १ पिस्तुल,१ भरमार बंदूक,१ वॉकीटॉकी चार्जरसह मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले.

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मिळालेले यश कौतुकास्पद असल्याचे गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला दक्षिण गडचिरोली भागात नक्षल चळवळीने डोके वर काढले असले तरी गडचिरोली पोलिसही त्यांना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: