Thursday, April 25, 2024
HomeMarathi News Todayऐतिहासिक भारत जोडो यात्रेत गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर...

ऐतिहासिक भारत जोडो यात्रेत गांधी-नेहरू उतरले रस्त्यावर…

Share

बुलढाणा, दि. 18 नोव्हेंबर
भारत जोडो यात्रेने आज इतिहास रचला. महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा वारसा जपणारे दोन माननीय व्यक्तिमत्व, महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पणतु राहुल गांधी हे दोघे आज भारत जोडो यात्रेत देश वाचवण्याच्या ऐतिहासिक कार्यात एकत्र सहभागी झाले. देशाचे संविधान व लोकशाहीवर हुकुमशाही सरकार घाला घालत असले तरी आम्ही लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हातात हाथ घालून निघाले आहोत असा संदेशच गांधी-नेहरू यांनी दिली.

देशात जेव्हा इंग्रज सत्तेची हुकमशाही राजवट जुलुम व अत्याचार करत होती तेंव्हा जनतेचा आवाज बुलंद करत गांधी – नेहरू रस्त्यावर उतरले होते. स्वातंत्र्याच्या लढ्याचा जाज्वल्य इतिहास आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोकांनी पुन्हा अनुभवला. राहुल गांधी व तुषार गांधी भाजपाच्या हुकुमशाही राजवटीविरोधात जनतेचा आवाज बुलंद करत आज रस्त्यावर उतरले.

एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा द्वेष, हिंसा, दहशत, अन्याय , अत्याचार डोके वर काढील तेव्हा तेव्हा बंधुभाव, अहिंसा, न्याय कायम राखण्यासाठी प्रत्येक युगात गांधी-नेहरू अवरतील आणि फक्त हिंदुस्थानलाच नाही तर संपूर्ण जगाला दिशा दाखवतील…

खिलते रहेंगे फूल चमन में,
अहिंसा-न्याय-भाईचारे के।
क्योंकि आते रहेंगे चमन में,
गांधी-नेहरू इसी बहाने से।।


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: