Homeराजकीयगळतगा येथे माजी खा.राजु शेट्टी यांच्या हस्ते गणेश आरती...राजु पोवार यांची देखील...

गळतगा येथे माजी खा.राजु शेट्टी यांच्या हस्ते गणेश आरती…राजु पोवार यांची देखील उपस्थिती…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

गळतगा ता.निपाणी येथे गणेश उत्सवाच्या २५ व्या महोत्सवानिमित्त हातकणंगले लोकसभेचे माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या हस्ते गणेश आरती दि.8 रोजी संपन्न झाली.यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजु पोवार हे देखील उपस्थित होते. यावेळी राजु शेट्टी बोलताना म्हणाले वर्षानुवर्षे केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची कुचेष्टा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे.

बारा महिने ऊस पिकवूनही त्यांना योग्य भाव दिला जात नाही. याशिवाय इतर पिकांचे भावही ठरलेले नाहीत. त्यामुळे सर्व पिकांना हमीभाव मिळावा, यासाठी शेतकरी बांधवांनी एकत्रित येण्याची गरज आहे. शिवाय शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे.

या पुढील काळात दोन्ही संघटना एकत्रित कार्यरत राहणार आहेत. यंदा ऊसाला ५ हजार रुपये दर मिळालाच पाहिजे.शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी घटस्थापने दिवशी सीमा भागात मेळावे घेण्यात येणार आहेत.यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

राजु पोवार म्हणाले निपाणी सीमा भागात शेतकऱ्यावरील होणारे अन्याय रोखण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. यापुढील काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत संघटना एकत्रित रित्या लढा देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जागृत राहून हमीभावासाठी एक संघपणे राहण्याची गरज आहे. तरच भविष्यात शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजु शेट्टी व राजु पोवार यांचे गावात आगमन होताच ढोल,ताशांच्या पारंपरिक वाद्यांने मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी रयत संघटनेचे कलगोंडा कोटगेचिनू कुळवमोडे, सुभाष चौगले,राजू उपाध्ये,नानासो कुंभार. बापूसाहेब पाटील,पिंटू तेरदाळे,संभाजी तेळवेकर,बाबासाहेब चेंडके,शिवानंद शिंदे,राहुल कोळी,पोपट स्वामीसिद्ध,उदय चौगुले,ऋषभ तेरदाळे,अनिल ढारव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,सदस्य व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments