रामटेक – राजु कापसे
दर वर्षी होणारा गंगा दशहरा दीप मोहत्सव याही वर्षी विदर्भाची काशी अंबाळा येथे काल दि. ९ जुन रोज गुरुवार ला सायंकाळी ७ वाजता वाजता दरम्यान थाटात पार पडला. यावेळी मंचावर पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, मल्लीकार्जुन रेड्डी, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे, कैलासपुरी महाराज नागर्जुन,

दिलीप देशमुख, प्राचार्य अविनाश श्रिखंडे, पं.स. सभापती कलाताई ठाकरे, बेलद्याचे सरपंच उमेश भांडारकर सौ. संध्याताई चौकसे, डॉ. राजेश ठाकरे, तुकाराम महाराज अगस्ती मुनी आश्रम, बिडीओ संदीप गोडशेलवार आदी. मंचावर उपस्थित होते.
काल दि. ९ जुन सायं. ७ वाजता दरम्यान येथील प्रख्यात अंबाळा तिर्थक्षेत्र येथे मोठ्या थाटात पार पडला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांसह ब्राम्हण मंडळींचा सत्कार समारंभ पार पडला. यानंतर ऋषीकेश किंमतकर यांचे प्रास्ताविक भाषण पार पडले.

यानंतर हजारोंच्या संख्येने जळते दिवे अंबाळा तलावात म्हणजेच गंगेत सोडण्यात आले. यावेळचे चित्र उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे होते. यानंतर अमोल गाढवे, ब्राम्हण मंडळी तथा उपस्थित नागरिकांच्या एकमुखी सुरात महाआरती झाली.
यावेळी महाआरतीच्या सुराने संपुर्ण परीसर गजबजुन गेलेला होता. आयोजन समिती व अंबाला निवासी समस्त ब्राम्हण वृंद यांच्या संयुक्त विद्यमान भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, माॅ गंगा दशहरा दीप मोहोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष ऋषिकेश किंमतकर यांच्या नेतृत्वात मोठ्या थाटात पार पडला.

दरम्यान आमदार आशिष जयस्वाल यांचे तर्फे नागरिकांसाठी तलाव परिसराच्या बाजुला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन मोहन कोठेकर यांनी केलेले होते. यावेळी उपस्थितांमध्ये रामभाऊजी पडोळे महाराज, ऋषीकेश किंमतकर, भारतीय जनसेवा मंडळ सदस्य बबलु दुधबर्वे, पी.टी. रघुवंशी, नंदकिशोर पापडकर यांचेसह हजारो नागरीक महिला पुरुष उपस्थीत होते.