Homeराज्यतीर्थक्षेत्र अंबाळा येथे गंगा दशहरा महोत्सव उत्साहात संपन्न...

तीर्थक्षेत्र अंबाळा येथे गंगा दशहरा महोत्सव उत्साहात संपन्न…

रामटेक – राजू कापसे

तिर्थक्षेत्रअंबाळा रामटेक येथे भारतीय जनसेवा मंडळाच्या आयोजनात गंगा दशहरा महोत्सव 9 जुनला सायंकाळी उत्साहात संपन्न झाला.यावेळी अथिति म्हणून अगस्ती ऋषी आश्रमाचे संत तुकारामबाबा, कैलास पुरी महाराज, विष्णु गिरी महाराज, लोटांगण महाराज, मुख्य अथिति किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, भारतीय जनसेवा मंडळचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे,

माजी आमदार व सहसचिव डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद सीईओ योगेश कुंभेजकर, बीडिओ संदीप गोडसेलवार, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सभापती कला ठाकरे, संध्याताई चौकसे जिल्हा परिषद सदस्य दुधराम सवालाखे, चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, आयोजन समितीचे अध्यक्ष रुषिकेश किंमतकर, सुशील पडोळे, सचिव शंकरराव चामलाटे, उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणाले की दिवंगत संत गोपाल बाबानी चालू केलेले उपक्रम जनसेवा मंडळ चालवित आहे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे पुरातन प्रथेचे व पर्यवरणाचे जतन होत आहे.विशेष बाब म्हणजे संत गोपाल बाबाच्या निधनानंतर लोकांमध्ये चर्चा होती की गोपाल बाबा नंतर शोभायात्रा, गंगा दसरा उत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम यांचे कसे होईल.

परंतु भारतीय जनसेवा मंडळचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांचे मार्गदर्शनात त्यांचे सहयोगी यांनी शोभा यात्रा, गंगा दसरा उत्सव व इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले. या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. रामटेकच्या विविध सामाजिक गटांना आपसात जोडून घेतले. कोणताही भेदभाव न करता एका पेक्षा एक सरस व कमी वेळेत कार्यक्रम करीत आहेत. याबद्दल लोक भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, त्यांचे सहयोगी यांचे कौतुक करीत आहे.

दुपारी 4 वाजता अगस्ती आश्रम गडमंदिर येथून ज्योत पेटवून नगर भ्रमण करीत अंबाळा तलाव येथे 6 वाजता पोहोचली. गोटू धनकर महाराज सहित अन्य ब्राह्मण वृंद द्वारे महापूजा करण्यात आली. त्यानंतर रात्रि 7.30 वाजता महाआरती झाली व लोकांनी आपली ज्योत अंबाळा तलावात विसर्जित केली.

यावेळेस मोठ्या संख्येत श्रद्धालुने अंबाळा तलावात ज्योत विसर्जित केली . टायरचा ट्यूबवर प्लायवूड ठेऊन ज्योती लावून डोंगयाचा सहाय्याने तलावात ओढल्या गेल्या. यावेळी नयनरम्य दृश्य जनतेनी बघितली. सम्पूर्ण अम्बाला तलाव ज्योतिनि उजळून निघाला. आतिशबाजी करण्यात आली. जनतेनी भक्ती संगीताच्या आनंद घेतला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाची प्रस्तावना ऋषिकेश किंमतकर, संचालन मोहन कोठेकर व आभार अमोल गाढवे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सृष्टीसौंदर्य परिवार रामटेक, विनायक डांगरे, शेखर बघेले, अशोक पटेल, नत्थू घरजाळे, पी. टी. रघुवंशी, सुमित कोठारी,रितेश चौकसे, बबलू दुधबर्वे, गजानन हटवार, दूषण कारामोरे, अमोल गाढवे, बालचंद खोडे, राहुल कोठेकर, अजय खेडकरकर, अजय मेहरकुडे, धर्मेश भागलकर, राजेश किंमतकर, भूषण नानोटे, विश्वास पाटील, नाना उराडे,

पवन कळंबे, शिवम दुधबवें, कैलास चिंटोले, अनिल ठाकरे, प्रीतम मोहबिया, स्वप्निल राहाटे, ईश्वर हांडे, पिंटू कोसे, शाम नेरकर, गजानन हटवार, सहित आदींनी प्रयत्न केले विशेष बाब म्हणजे शुक्रवारी सकाळी सृष्टिसौंदर्य परिवार ग्रुप अंबाडा तलावांची स्वच्छता व साफसफाई केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments