HomeBreaking Newsआम्हाला सूरत मधून बाहेर काढा...शिवसेनेच्या काही आमदारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन...

आम्हाला सूरत मधून बाहेर काढा…शिवसेनेच्या काही आमदारांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन…

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आणि सुमारे दोन डझन आमदार सुरतमध्ये तळ ठोकल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आताच आलेल्या माहितीनुसार, सुरुत येथे गेलेल्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मदतीसाठी फोन केला असल्याची माहिती समोर येत आहे.

या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी बैठक बोलावली होती, त्यात जेमतेम 20 आमदार उपस्थित होते. अशा स्थितीत उद्धव ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. तर आताच आलेल्या माहितीनुसार सूरत येथे गेलेल्या काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून आम्हाला बाहेर काढण्याची विनवणी केलिऊ असल्याची माहिती मिळाली आहे.

सूरत येथे ले मेरिडीयन हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेचे दोन डझन आमदारांपैकी किती आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत हे आपल्याला एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्र्याचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना संपर्क करणार का? हे लवकरच बघायला मिळणार आहे.

शिवसेनेकडे 55 आमदार असून 27 आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांना पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. अशा परिस्थितीत 35 आमदार उद्धव ठाकरेंच्या सभेपासून दूर राहणे मोठे संकेत देत आहेत. मात्र, शिवसेना आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतली आहे. एकीकडे त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांच्याकडे ही कमान सोपवली.

दरम्यान, भाजपच्या या दाव्यामुळे शिवसेना आणि आघाडी सरकारच्या चिंतेतही भर पडली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हाला मिळालेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे ३५ आमदारांसह गेले आहेत. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात सरकार अल्पमतात येण्यास थोडा वेळ लागेल. ते म्हणाले की एमएलसी निवडणुका आणि सर्व राज्यांच्या निवडणुकांमध्ये आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला आहे. अनेक अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला मतदान केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments