Homeराज्यगोपीकिशन बाजोरिया हे कधीच शिवसेनेसाठी दखलपात्र नव्हते अन नाहीत : विजय मालोकार...

गोपीकिशन बाजोरिया हे कधीच शिवसेनेसाठी दखलपात्र नव्हते अन नाहीत : विजय मालोकार…

शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेच्या भरोशावर ‘गब्बर’ झालेले माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अनेक पोकळ वल्गना सुरू केल्या आहेत. मुळात गोपीकिशन बाजोरिया यांना किती गांभीर्याने घ्यायचं?, हाच खरा प्रश्न आहे. स्वतःला तीन वेळा विधान परिषदेचे आमदारकी, विधानसभेची उमेदवारी, मुलाला परभणी-हिंगोली मतदारसंघातून पक्षाकडून आमदारकी, वेळोवेळी पक्षाकडून दिलेले विविध विकास निधी यानंतरही बाजोरियांची भूक भागली नाही.

बाजोरियांसारख्या राजकारण्याचा बुरखा पांघरलेल्या व्यापारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून अकोला विकासाच्या गप्पा म्हणजे या शतकातला सर्वात मोठा विनोद म्हणता येईल. स्वतःला खूप मोठे नेते समजणाऱ्या गोपीकिशन बाजोरियांनी आगामी अकोला महापालिकेतील 91 पैकी कोणत्याही वार्डातून उभे राहावं,

शिवसैनिक त्यांचा डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असं आव्हान त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं आहे. स्वतःला मोठा फुगलेसा ‘बैल’ समजणाऱ्या या ‘बेडका’ला आता शिवसेना सोडल्यानंतर स्वतःची खरी ताकद, लायकी आणि औकात आमचे शिवसैनिक दाखवून देतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments