Thursday, April 25, 2024
Homeराज्यकालंका देवी मंदीर ते वैष्णोधाम भव्य पालखी पदयात्रेचे थाटात आयोजन...

कालंका देवी मंदीर ते वैष्णोधाम भव्य पालखी पदयात्रेचे थाटात आयोजन…

Share

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण तर्फे आयोजन

रामटेक – राजू कापसे

काल दि. २९ सप्टेंबर रोज गुरुवारला नवरात्रीच्या पावन पर्वावर माँ. कालंका देवी मंदिर रामटेक ते वैष्णोधाम, रामधाम (मनसर) पर्यंत भव्य पालखी पद यात्रेचे आयोजन चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण तर्फे करण्यात आले होते. यात शेकडो महिला – पुरुषांनी हजेरी लावत रामधाम येथील माॅ वैष्णोदेवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

या पदयात्रेची सुरुवात माँ. कालंका देवी चे पूजन करून व पालखीचे पूजन करून करण्यात आली. ही पदयात्रा रामधाम येथे पोहोचल्यावर रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपाल चौकसे व सौ. संध्याताई चंद्रपाल चौकसे यांनी स्वागत करून पालखीचे पुजन केले. नंतर पदयात्रेत सहभागी झालेल्या भक्तांनी रामधाम येथील माँ. वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. यानंतर रामधाम येथे आयोजित सौ. कलाताई रामभाऊ पडोळे (रामटेक), यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली.

या कीर्तनाचा लाभ शेकडो भक्तांनी घेतला. दरम्यान चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी महिला भजन मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सौ. संध्याताई चंद्रपाल चौकसे यांचे हस्ते पालखी पदयात्रेत सहभागी १००० महिलांना ओटी देण्यात आली.

नंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उपस्थीतांमध्ये पी.टी. रघुवंशी, नितीन भैसारे, बबलू दुधबर्वे, डॉ. अंशुजा किंमतकर, ऋषिकेश किंमतकर, नीलकंठ महाजन, इरशाद पठाण, नासिर शेख, चंद्रभान शिवरकर, मोहन कोठेकर, भाऊराव रहाटे, श्याम बिसन,

रुपेश जांबुलवार, शिवराम महाजन, अनिल बंधाटे, वसंता धुंडे, यादव जांभूळकर, शोभाताई राऊत, पुष्पाताई बर्वे, शारदाताई बर्वे, रंजना मस्के, शोभाताई अडामे, अर्पनाताई वासनिक, अश्विनी कराडे, तुळसबाई महाजन, राकेश कंगाली, स्वप्नील रहाटे व हजारो भक्तगण उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: