Homeराज्यमहात्मा फुले स्मारक समिती व माळी यूवक संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव...

महात्मा फुले स्मारक समिती व माळी यूवक संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

पातूर – निशांत गवई

आज दिनांक 28 /11/ 2022 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक पातूर येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहरवासीयांचे वतीने अभिवादन करण्यात आले. पातुर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून थोर पुरुषांच्या विचारांची देवाण-घेवाण करण्याकरिता पुण्यतिथीचे निमित्त साधुन महात्मा जोतिराव फुले स्मारक समिती,

माळी युवक संघटना पातूर व विविध संघटनांच्या वतीने महात्मा फुले यांचे विचारांचा प्रसार तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचे सर्वांनी मान्य करुन फुल हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी न. प. उपाध्यक्ष परसराम उंबरकर, माजी न. प. उपाध्यक्ष सुरेंद्र उगले, समाजसेवक सुनील गाडगे, मोहन गाडगे,अजय पाटील, अनिल निमकंडे, अंबादास देवकर, निखिल इंगळे, किरण कुमार निमकंडे, सुभाष इंगळे,बाळुभाऊ उगले, पिंकू तायडे, गोपाल तायडे, सुनील बोचरे, गणेश तांबटकार,रुतीक हिरळकार ईत्यादींसह शहरवाशी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments