Homeराजकीयजत तालुक्यातील जनता महाराष्ट्र सोडून जाणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचं...

जत तालुक्यातील जनता महाराष्ट्र सोडून जाणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचं मत…

सांगली – ज्योती मोरे.

कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील 65 गावं कर्नाटकात सामावून घेण्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जत तालुक्यातील जनतेकडून निषेध व्यक्त केला जात असून हे लोक महाराष्ट्र सोडून जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान ज्यावेळी जत पूर्वभागासाठी पाणी मागितलं होतं ,त्यावेळी कर्नाटकने तो प्रस्ताव फेटाला होता.त्यामुळे या ठिकाणच्या लोकांसाठी आम्ही म्हैसाळ विस्तार योजना प्रस्थापित केली असून ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मंजूर होणार असल्याचंही डॉ.सुरेश खाडे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments