Homeराज्यहवलदार विनायक औताडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त निराधार आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे केले वितरण...

हवलदार विनायक औताडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त निराधार आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे केले वितरण…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कागल पोलीस ठाण्यातील पोलीस हवलदार विनायक औताडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अवाढवी खर्चाला मुठमाती देऊन मत्तिवडे ता.निपाणी येथील भारतीय समाज सेवा निराधार आश्रमाला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.त्यांनी मागील वर्षी देखील याच आश्रमात जाऊन येथील निराधार लोकांच्या सोबत आपला वाढदिवस साजरा करुन आर्थिक मदत केली होती.

आणि यंदाही आपला वाढदिवस याच आश्रमात साजरा करुन याठिकाणी एक वेळचे पोटभर जेवळ आणि जिवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. या केलेल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.प्रारंभी निराधार आश्रमाच्या संचालिका शुभांगी पोवार यांनी औताडे यांचे औक्षण केले व.केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या केलेल्या मदतीबद्दल आश्रम चालक अमर पोवार यांनी आभार मानले.यावेळी प्रमुख उपस्थिती कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके पाटील या होत्या.याप्रसंगी बिरंजे , विजयकुमार शिंदे ,सुरज कांबळे,कृष्णात गोंधळी,अजय कांबळे,सचिन कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments