Homeगुन्हेगारीव्हिस्टा कार चोरी करणारी टोळीस हिमायतनगर पोलीसांनी केले गजाआड...

व्हिस्टा कार चोरी करणारी टोळीस हिमायतनगर पोलीसांनी केले गजाआड…

नांदेड – महेंद्र गायकवाड

हिमायातनगर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी देवजी मारोती माजळकर रा. बाळकेवाडी यांनी तक्रार दिली की, त्यांची चार चाकी टाटा व्हिस्टा कार क्रमांक MH-2G-AK-2440 ही त्यांचे मित्र शिवाजी माने रा. बाबी यांना वापरण्यासाठी दिली होती व ती व्हिस्टा कार किंमत अंदाजे दोन लाख रुपये ही दि.1ऑगस्टचे रात्री कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरुन नेली वगैरे रिपोर्टवरून पो.स्टे. हिमायतनगर येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी गु.र.न 190/2022 कलम 379 भादवी प्रमाणे अज्ञात चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरं गुन्ह्यांचा तपास करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, यातील कार चोरी करणारे अज्ञात आरोपी हे संतोष तूकाराम करपे आणि गजानन नागोराव माने दोघे रा. मौजे बाबी ता. हिमायतनगर जि.नांदेड येथील असून त्यांनी ती कार चोरुन ता. लोहा येथील पेट्रोलपंपाजवळ नेवून सोडल्याचे माहिती मिळाली वरुन सदरची कार कि. अं. दोन लाख रुपये ही पोलीस स्टेशन येथे आणून गुन्हयात जप्त केली.

यातील आरोपी संतोष तूकाराम करपे व गजानन नागोराव माने दोघे रा. मौजे वाघी ता. हिमायतनगर है। दि. 20 ऑगस्ट रोजी जवळगाव रेल्वेस्टेशन वर असल्याची माहिती मिळालीवरुन त्यांना शिताफीने ताब्यात घेवून व विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबूली दिली आहे. यावरून वरुन आरोपीस आज रोजी वि. कोर्टात हजर केले असता त्यांचा दि. 22 ऑगस्ट पावेतो रिमांड मिळाला असून गुन्हयाचा तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक श्री बी.डी. भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / बी. जी. महाजन, पोहेकॉ नामदेव पोटे पोहेकॉ हेमंत चोले, पोहेकॉ अशोक सिगणवाड, नापोकों / शाम नागरगोजे, चालक सफा/मिलींद कात्रे यांनी पाडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments