राज्यात राजकीय भूकंप घडवून आणणारे एकनाथ शिंदे याचं पुन्हा एक नवीन ट्वीट समोर आलंय, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली यानंतर एकनाथ शिंदें सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते मात्र आता त्यांनी ट्वीट करून गेल्या आधीच वर्षात आपल्यासोबत काय काय झाले चार मुद्यात सांगितले आहे.
मिळालेल्या माहिती वरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर असून सुद्धा त्यांनी नाकारल्याचे दिसत आहे, ते आपल्या मतावर ठाम असल्याचे ट्वीट मधून दिसून येत आहे. काय ट्वीट केलंय ते पाहूया…
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
HindutvaForever
