Homeराज्यमा.जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनी वडाळी पर्यटन स्‍थळाची केली पाहणी...

मा.जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनी वडाळी पर्यटन स्‍थळाची केली पाहणी…

अमरावती – मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर व महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी शुक्रवार दिनांक २४ जुन,२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वडाळी पर्यटन स्‍थळाची पाहणी केली. या पाहणी दरम्‍यान अतिरिक्‍त आयुक्‍त हर्षल गायकवाड, शहर अभियंता रविंद्र पवार, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक विवेक देशमुख, उपअभियंता भास्‍कर तिरपुडे, प्रमोद कुळकर्णी, अभियंता राजेश आगरकर उपस्थित होते.  

तसेच शासनाच्‍या इतर विभागाचे अधिकारी जसे की, वन विभाग, पर्यटन विभाग, जिल्‍हा नियोजन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अधिकारी उपस्थित होते.अमरावती येथील वडाळी गार्डन हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील वैशिष्ट्यपूर्ण उद्यान आहे. शहरालगत विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या या गार्डनच्या विकासातून पर्यटनवाढीस मोठा वाव आहे. त्यामुळे येथे नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून अभिनव उपक्रम राबवावेत, असे निर्देश जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी दिल्‍या.

जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी संपूर्ण उद्यानाची व त्यातील उपक्रमांची पाहणी केली व पर्यटकांच्या प्रतिसादाबद्दल माहिती घेतली. जिल्‍हाधिकारी पवनीत कौर म्हणाल्‍या की, अमरावती जिल्हा हा निसर्गसंपदेने समृद्ध आहे. त्यातही नैसर्गिक वनांचा वापर करून महानगराजवळ विकसित झालेले वडाळी उद्यानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

वडाळीच्‍या परिसरात पक्षांच्‍या शेकडो प्रजाती येथे पाहायला मिळतात. एकाचवेळी पर्यटनाचा आनंद व निसर्गशिक्षण देणारे हे स्थळ आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन त्यानुरूप अभिनव उपक्रम येथे राबवले पाहिजेत. पर्यटकांना शास्त्रीय माहिती व वृक्षमहात्म्य सांगू शकेल, अशा कुशल गाईडची टीम येथे असणे आवश्यक आहे. तसेच केंद्र शासनाच्‍या व राज्‍य शासनाच्‍या तसेच महानगरपालिका निधीतून तलावाचे नूतनीकरण करण्‍याच्‍या प्रस्‍तावाबाबत सुध्‍दा त्‍यांनी माहिती घेतली.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments