HomeBreakingतेलंगणातील 'या' हॉटेलला आग...आगीत ६ जणांचा मृत्यू...

तेलंगणातील ‘या’ हॉटेलला आग…आगीत ६ जणांचा मृत्यू…

तेलंगणातील सिकंदराबाद येथील एका हॉटेलला मंगळवारी आग लागली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला आग लागल्याने ही घटना घडल्याचे वृत्त आहे, त्यामुळे धूर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

तर हॉटेलमधील काही जणांनी स्वतःला वाचविण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या आणि स्थानिकांनी त्यांना वाचवले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. लॉजमधून काही जणांची सुटका करण्यात आली. ही घटना कशी घडली याचा आम्ही तपास करत आहोत असे तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments