Thursday, April 25, 2024
Homeव्यापारराज्यातील सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये कसा आणि कोणामुळे गेला?…

राज्यातील सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये कसा आणि कोणामुळे गेला?…

Share

महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लांट उभारण्याच्या घोषणेनंतर पुन्हा राज्यात एकदा राजकारण तापले आहे. विरोधक शिंदे सरकारला सातत्याने प्रश्न करत आहेत की, महाराष्ट्रासोबतचा सर्व व्यवहार जवळपास पक्का झाला होता, मग तो गुजरातकडे कसा गेला? राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करताना, राजकीय दबावाखाली प्लांट महाराष्ट्रातून हिसकावण्यात आला, तो परत आणावी लागेल. सरकारने यापुढेही सर्वतोपरी प्रयत्न करून महाराष्ट्रात याची स्थापना करावी, असे ते म्हणाले. हा प्लांट महाराष्ट्रात आला नाही तर राज्याच्या आर्थिक विकासाला मोठा धक्का बसणार असल्याचे पवार म्हणाले. राज्याच्या आर्थिक स्थितीसाठी हा करार हिसकावून घेणे महागात पडणार असल्याचे ते म्हणाले.

1.54 लाख कोटी रुपयांचा करार
भारतीय समूह वेदांत आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन गुजरातमध्ये 1.54 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट उभारणार आहे. वेदांत-फॉक्सकॉन संयुक्त उपक्रमाचे डिस्प्ले एफएबी उत्पादन युनिट, सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी युनिट राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यात 1000 एकर क्षेत्रामध्ये स्थापित केले जाईल. या संयुक्त उपक्रमात दोन्ही कंपन्यांचा अनुक्रमे 60 टक्के आणि 40 टक्के हिस्सा असेल.

आताचे शिंदे-फडणवीस सरकारने 26 जुले रोजी मंत्रालयात वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली होती, या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रीकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांता कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आता अचानक हा प्रोजेक्ट गुजरात गेल्याने राज्यातील विरोधी पक्ष नेते आक्रमक झाले मात्र सत्ताधारी शांत असून उलट आपल्याला दुसरा यापेक्षाही मोठा प्रोजेक्ट पंतप्रधान मोदी आपल्या राज्यात देतील अशी समजूत काढताना आता दिसत आहे.

सध्याच्या सरकारने संभाव्य गुंतवणूकदारांचा विश्वास गमावला आहे: आदित्य ठाकरे

शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीने (एमव्हीए) सत्तेत असताना हा प्रकल्प जोरदारपणे पुढे रेटला होता. आमच्या एमव्हीए सरकारने शेवटच्या टप्प्यात आणला होता. विद्यमान सरकारने संभाव्य गुंतवणूकदारांचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे असे मोठे प्रकल्प येथे येत नाहीत. आदित्य ठाकरे म्हणाले की , या मेगा प्रकल्पामुळे 160 सहायक उद्योगांना मदत झाली असती आणि 70,000 ते 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ते म्हणाले की, मागील एमव्हीए सरकार कंपनीच्या संपर्कात होते आणि या वर्षी जानेवारीमध्ये त्यांच्या प्रतिनिधींसोबत एक बैठकही झाली होती.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: