Homeमनोरंजनरसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथे आहे!…अशोक सराफ - रसिकांचे मानले मनःपूर्वक आभार..!

रसिक प्रेक्षकामुळेच आज मी इथे आहे!…अशोक सराफ – रसिकांचे मानले मनःपूर्वक आभार..!

प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात दिली मानवंदना! हाऊसफुल्ल गर्दीतील व्हॅक्यूम क्लीनर चा प्रयोग व अभूतपूर्व सत्कार सोहळा! अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा…पत्रकार शीतल करदेकर

मुंबई – गणेश तळेकर

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा दादरच्या श्री शिवाजी मंदिरात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अशोक सराफ यांच्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाच्या प्रयोगाच्या दरम्यान त्यांचा सत्कार ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्था व परिवारातर्फे करण्यात आला. या प्रयोगासाठी आणि सत्कार सोहळ्यासाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश होता. 

‘अष्टविनायक’ नाट्यसंस्था व परिवारातर्फे अशोक सराफ यांच्या वयाची पंचाहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. अशोक सराफ यांच्या परिवारासह निर्मिती सावंत, चिन्मय मांडलेकर, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, प्रणित बोडके आदी मान्यवर, हितचिंतक यावेळी उपस्थित होते. 

यावेळी अशोक सराफ यांनी रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले तुमच्यामुळेच आज मी इथे आहे* अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. लेखक व दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर, निर्माते दिलीप जाधव यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.

हाऊसफुल्ल गर्दीतील व्हॅक्यूम क्लीनर चा प्रयोग आणि अभूतपूर्व अशा सत्कार सोहळ्यात प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्याच्या गजरात अशोक सराफ यांना मानवंदना दिली! पत्रकार शीतल करदेकर यांनी प्रेक्षकांच्या वतीने बोलताना, अशोक सराफ यांना पद्मश्री मिळावी ! यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन केले. वरील वृत्ताला आपल्या वृत्तपत्रात, चॅनल मध्ये प्रसिद्धी द्यावी, ही विनंती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments