Homeराजकीयनांदेडमध्ये काम करताना सामान्य नागरीकांकडून मिळालेले प्रेम, आदर मला सदैव स्मरणात...

नांदेडमध्ये काम करताना सामान्य नागरीकांकडून मिळालेले प्रेम, आदर मला सदैव स्मरणात राहील – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटणकर यांची बदली नागपूर येथें झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश दिनांक 18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर 19 ऑगस्ट रोजी नागपूर जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी आपल्या ऑफिशियल पेजवरून नांदेकरांचे आभार मानले आहेत. सोशल मीडियावरील आपल्या पोस्ट मध्ये ते म्हणाले की,

धन्यवाद नांदेड…..!

सर्वांना नमस्कार.
अडीच वर्षांपूर्वी ऐतिहासिक नांदेड शहरात मी जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालो. येथे मला अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली. सर्वच कामात मला जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि नागरीकांचे मोठे सहकार्य मिळाले.

नांदेडमध्ये काम करताना मला सामान्य नागरीकांकडून मिळालेले प्रेम, आदर मला सदैव स्मरणात राहील. नांदेडची कारकीर्द मला कधीही विसरता येणार नाही. राज्य सरकारने माझी नागपूर जिल्हाधिकारी पदावर बदली केली असून मी तेथे रुजू झालो आहे. संपर्कात राहूया.
पुनश्च एकदा सर्वांचे आभार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments