सांगली – ज्योती मोरे.
राज्यात कोणत्याही राजकीय वादळ उठले असले तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. एकनाथ भाई परत या अशा घोषणाही शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.
बुधवारी सकाळी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर प्रमुख महिंद्र चंडाळे, मयूर घोडके महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे,मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, माजी शहरप्रमुख अनिल शेटे, भगवानदास केंगार, अमोल कांबळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ. शिवसेनेचे आमदार कुठेही जाणार नाहीत.
ते परत येतील, बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी चर्चा केली पाहिजे होती. शिवसेनेला त्रास देणारे कोण आहेत त्याची जाणीव असलेले नेत्यांनी योग्य भूमिका घ्यावी उध्दवजी योग्य तोडगा काढतील असे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यावेळी म्हणाले. यावेळी राम काळे, संदीप ताटे, गजानन मोरे, धनाजी कोळपे, किरण पवार, कैस अलगुर, अजित राजोबा, प्रशांत शिकलगार, अज्जू बोजगर, प्रकाश जाधव,
सुरज डवरे, किरण राजपुत, मोईन बागवान, मुबारक मलबारी, महिला आघाडी उपजिल्हा संघटक सरोजिनी माळी, मिरज शहर प्रमुख शकीरा जमादार, उमा मोटे कुपवाड, मिरज तालुका प्रमुख माधुरी चव्हाण, मनिषा पाटील, स्नेहल माळी, माधवी केंगार, यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.