Homeकृषीपहिल्या यादीत ६२ शेतकऱ्यांना मिळाला प्रोत्साहन निधीचा लाभ...

पहिल्या यादीत ६२ शेतकऱ्यांना मिळाला प्रोत्साहन निधीचा लाभ…


—- नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ.
—- प्रत्येक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळाले 50 हजार.
—- स्टेट बँक लोहारीसावंगा अंतर्गत पहिल्या यादीत 62 शेतकऱ्यांची नावे .
— नियमित कर्ज परतफे करणे योग्य – रामभाऊ गोविंदराव जोध शेतकरी
— स्टेट बँकेच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार.

नरखेड – अतुल दंढारे

राज्य शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली त्यांना सुद्धा लाभ मिळावा यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. कोरोनामुळे शेतकऱ्यांना तो निधी त्या वेळेस वाटप करण्यात आला नाही. परंतु काही दिवसा पासून शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी 50 हजार मिळाला सूरवात झाली असून शासनाने अशा शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा व्हायला सुरवात झाली आहे.

लोहारीसावंगा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शेतकरी खातेदारांची पहिल्या यादीत 62 शेतकऱ्यांची नावे असून त्या सर्वांच्या खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन निधी जमा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात शेतकरी लोवरीसावंगा शाखेतून 62 शेतकरी आजू बाजूच्या गावातील आहे. या सर्व शेतकऱ्यांचा स्टेट बँकेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित श्री रामभाऊ गोविंदराव जोध साहेबराव गोविंदराव जोध हरीशशंकर गिरीजाशंकर चौधरी कुसुमबाई भगवन्तराव जोध वनिता वासुदेवराव काटोले अनिल भगवंतराव जोध राजु शंकरराव जुमडकर शिवदास परसराम शेंडे शाखा व्यवस्थापक ममता सोरते, निलेश सोनकुसले सुरेश मेश्राम, रोशन कुर्वे, किरण सिरस्कार, मनिष काटोले शेतकरी वर्ग कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन सुरेश मेश्राम यांनी केले.

विशेष म्हणजे विषश म्हणजे लोहारीसावंगा शाखेत जिल्हातून सगळ्यात जास्त लाभार्थी आहे शेतकऱ्यांचा समावेश या 62 शेतकऱ्यांच्या यादीत आल्यामुळे नियमित कर्ज परतफेड करण्यासाठी प्रोत्साहित केल्याबद्दल बँकेच्या वतीने उपस्थित सर्व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो ओळी. शेतकऱ्यांचा सत्कार शाखा व्यवस्थापक ममता सोरते

नियमित शेती कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोस्ताहन पर ५००००/- अनुदान बचत खात्यात जमा झाले.शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. पहिल्या यादीमध्ये भारतीय स्टेट बँक लोहारी सावंगा चे एकुण ६२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.यामुळे कर्जमाफीची वाट बघत बसुन आपला सिबिल स्कोर खराब करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना कर्ज खाते नियमित ठेवण्याचे प्रोत्साहन मिळेल.

ममता सोरते, शाखा व्यवस्थापक लोहारीसावंगा… :- नियमित कर्ज सर्वांनी भरावे माझा सत्कार केल्याबद्दल बँकेचे आभार रामभाऊ गोविंदराव जोध शेतकरी लोहारीसावंगा

शेतकऱ्यांचा कधीही सत्कार होताना मी बघितला नाही. परंतु भारतीय स्टेट बँकेच्या वतीने शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला ती गोष्ट आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आहे. नियमित कर्जाची परतफेड केल्यामुळे शासनाच्या वतीने आम्हाला 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळावा व विशेष म्हणजे आम्हा शेतकऱ्यांचा बँकेच्या वतीने सत्कार ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
वनिता वासुदेवराव काटोले शेतकरी लोहारा

प्रत्येक शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरावे नियमित राहुन बँकेला सहकार्य करावे राजेंद्र जुमडकर शेतकरी लोहारीसावंगा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments