यंदा लवकरच दाखल होणारा मान्सून सतत हुलकावण्या देत असून अजूनही राज्यात पाहिजे तसा दाखल झाला नसल्याने यंदाच्या खरीप पेरण्या लांबणीवर जाणार असणार आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून सरासरीइतका राहणार आहे, तर येत्या पाच दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाचे केएस होसळीकर यांनी ट्वीकरून हि माहिती दिली आहे. पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटी वादळ / विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये पुढील 5 दिवसांत मुसळधार पाऊस; 15-17 जून दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात व 19 जून रोजी विदर्भात. IMD चा संदर्भ देत अशी माहिती ट्वीट केली आहे.
गत आठवड्यापासून १५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र ठराविक ठिकाणे वगळता उर्वरित ठिकाणी ढगाळ तर बऱ्याच कडक उन्हाचा सामना करावा लागला आहे.
यंदा मान्सूनचे देशात आगमन हे नियमित वेळेच्या तीन ते चार दिवस आधी झाले. मात्र तरीही १ ते १४ जूनपर्यंत देशात मान्सून व मान्सूनपूर्वचे मान्सूनचा अंदाज चुकला असल्याने यंदाचे पर्जन्यमान मिळून सरासरीच्या ३६ टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातही सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत ५३ टक्के कमी पाऊस पडला आहे.सुरुवातीला भारतीय हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट यांच्यात मान्सून दाखल होण्यावरून दावे-प्रतिदावे केले होते.