Homeराज्यप्रभाग १४ मध्ये विकास कामाचे उदघाटन...

प्रभाग १४ मध्ये विकास कामाचे उदघाटन…

सांगली – ज्योती मोरे

आज प्रभाग क्रमांक 14 मधील संत रोहिदास नगर सिध्दार्थ परिसर सांगली येथे, कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रभागातील जेष्ठ नागरिक व प्रभागातील राष्ट्रवादी च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज व युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार व महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्याकडे प्रभागातील राष्ट्रवादी च्या बुथ अध्यक्ष व नागरिक यांनी रस्ता करून मिळावा अशी मागणी करण्यात आल होती त्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात,अल्पसंख्याक शहर-जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर,प्रमुख सचिव शुभम जाधव,वैशालीताई धुमाळ,लक्ष्मण मोने,कुणाल गालिंदे,पिंटूभाऊ माने,अकबर शेख,अक्षय अलकुंटे,सचिन कांबळे,इर्शाद पखाली ,अक्षय शेंडगे,अमीन शेख,प्रकाश संकपाळ,अशोक हंकारे, रामभाऊ बनसोडे,विजय हंकारे, बापूराव चव्हाण,प्रमोद हराळे यांच्यासह प्रभागातील महीला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments