Homeराज्यआनंदधाम रामटेकच्या वतीने मनसर येथे मानव मंदिराचे उदघाटन...

आनंदधाम रामटेकच्या वतीने मनसर येथे मानव मंदिराचे उदघाटन…

रामटेक – राजू कापसे

आनंदधाम रामटेकच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रामटेक तालुक्यातील मनसर येथे १० सप्टेंबर २०२२, शनिवारला  परमात्मा एक मंडळातर्फे मनसर येथे मानव मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पारशिवनी, रामटेक, देवलापार ते मनसरपर्यंत रथयात्रा काढण्यात आली. या प्रार्थना स्थळासाठी मनसर येथील मा. दिलीपजी पेटकर व मा.सौ.डॉ. रंजना पेटकर या दांपत्याने मोठी खोली दान केली आणि ती दान केलेली मोठी खोली ही परमात्मा एक परिवारासाठी हक्काचे प्रार्थना स्थळ झाले आहे. या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक  माजी आमदार डी. मल्लीकार्जुन रेड्डी ,महाराष्ट राज्य व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व ब्रँड अँबेसेडर  कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणराव (बाबूजी) मेहर उपस्थीत होते.

या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमाने, रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशीष जैस्वाल,जि.प. सदस्य सतीश डोंगरे, पं.स.सभापती कलावती उमेश ठाकरे,मनसर ग्रा.पं. चे सरपंच योगेश्वरीताई चोखांद्रे , विजयजी हटवार, माजी सदस्य खाद्य निगम भारत सरकार तसेच नमो नमो मोर्चा चे राष्टीय अध्यक्ष विजय हटवार,  समाजसेवक हेमराज चोखांद्रे,ग्रा.पं.सदस्य नंदकिशोर चंदनखेडे , युवा मार्गदर्शक बजरंग मेहर, सर्पमित्र राहुल कोठेकर, किशोर खडोदे, मंगल घुगे,नंदकिशोर तांडेकर, देवचंद मेश्राम, कचरू माथरे, देवा मेहरकुळे, विनोद देवगडे, सुरेश गिरी,भोजराज लोंढे,अशोक माथरे, मनोहर हिंगे, गणेश केळवदे, अंकित निंबोने आदी उपस्थित होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
राजू वसंतराव कापसे शितलवाडी परसोडा रामटेक जि, नागपूर हे महाव्हाईस न्यूज चे संस्थापक सदस्य असून ते गेल्या पाच वर्षापासून रामटेक प्रतिनिधी म्हणून काम सांभाळतात...
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments