Homeराज्यप्रभाग क्रमांक आठ मधील शाहूनगर अंतर्गत रस्त्यांच्या मुरमीकरण कामाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन...

प्रभाग क्रमांक आठ मधील शाहूनगर अंतर्गत रस्त्यांच्या मुरमीकरण कामाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन…

सांगली – ज्योती मोरे

राज्याचे माजी जलसंपदा तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी राज्य शासनाकडून दिलेल्या विशेष निधीतून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रयत्नातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील शाहू नगरातील अंतर्गत रस्त्यांच्या मुरमीकरणाच्या कामाचा शुभारंभ महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, नगरसेवक विष्णू माने यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मारुती पाटील, जितेंद्र हेगडे, सुनील भोसले, विकास म्हेत्रे, श्रीधर घोरपडे, गणेश माने, अभिषेक माने, बाजीराव पायमल, माणिक पांढरे, रावसाहेब खांडेकर, विनायक शिंदे, बाळासाहेब खांडेकर, बाळासाहेब माने, मुकादम प्रकाश चव्हाण, सुजाता पवार,प्रदीप जोशी, रमेश बिराजदार, विक्रम कोरुच, मारुती कांबळे, वैभव भिंगारदेवे, ढेरे सर, डॉक्टर माळी, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments