Homeकृषीढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन…हमीभाव ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी…राजू पोवार

ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन…हमीभाव ठरविण्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी…राजू पोवार

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री…

ढोणेवाडी ता. निपाणी येथे कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या 40 व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच झाले असून याप्रसंगी बोलताना रयत संघटना चिकोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार म्हणाले, शेतकऱ्यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय  अत्याचार  केला जात आहे.त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे.शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कर्नाटक राज्य रयत’संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. तर कर्नाटक राज्य रयत संघटना जिल्हा अध्यक्ष राजू पोवार,विठ्ठल माळी- महाराज, मनोहर बेनाडे, रमेश पाटील ,तानाजी जाधव, एकनाथ सादळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत संघटना नामफलकाचे अनावरण झाले.या कार्यक्रमास उमेश भारमल,रमेश पाटील, सर्जेराव हेगडे,भगवंत गायकवाड, सुनील गाडीवड्डर,बबन जामदार ,नामदेव साळुंखे

बाबासाहेब पाटील, चिनू कुळवमोडे, सुभाष चौगुले, भरत गेबीसे, जयगोंडा पाटील, राजाराम पाटील, पवन माने, संजय पोवार, तानाजी पाटील, नानासाहेब कुंभार,नानासाहेब पाटील, संजय जोमा, अनिकेत खोत, भरत सुतार, ढोणेवाडी शाखा अध्यक्ष एकनाथ सादळकर, उपाध्यक्ष बाळासाहेब खडके,कार्याध्यक्ष सुभाष खोत, सेक्रेटरी राहुल पाटील,सदस्य सोमनाथ परकाळे ,शितल सूर्यवंशी,अमोल नागराळे, बाहुबली मेक्कळके, दादासाहेब सादळकर,संजय पाटील, मकबूल जमादार,सदाशिव भेंडे, राजू कोपर्डे यांच्यासह रयत संघटनेचे विविध गावातील सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.राजेंद्र बेनाडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments