Homeराज्यनेर्ली येथील भैरवनाथ दूध संस्थेच्या विस्तारित इमारत उद्घाटन...

नेर्ली येथील भैरवनाथ दूध संस्थेच्या विस्तारित इमारत उद्घाटन…

भेट वस्तू वाटप सह दुधू उत्पादक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न – आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते

कोल्हापूर – राजेद्र ढाले

नेर्ली ता करवीर येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्था मर्यादित नेर्ली या संस्थेच्या विस्तारित इमारत उद्घाटन व भेट वस्तू वाटप सोहळा पार पडला या या प्रसंगी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की एखादी संस्था चालू करून चाळीस वर्षे टिकवणे सोपे नसते ही संस्था वाढवली मोठे केली संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण शेतकऱ्यांचा विकास कसा करावा याचे उदाहरण आपल्या समोर आहे.

त्याचबरोबर या संस्थेचे संस्थापक चेअरमन व करवीरचे माजी सभापती कै.रामभव पाटील यांचा त्यानें केलेल्या कार्याला उजाळा दिलाआपले येथील पाणी प्रश्न असो पाठाचे विस्तारीकरण साकव पूल यासाठी मोठा निधी आणला असून आमदार म्हणून मी व बंटी साहेब गावचे प्रश्न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य देतो पुढे आपल्या मनोगतात गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे यांनी दूध वाडी बद्दल मार्गदर्शन केले.

गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर बाबासो चौगुले व गोकुळचे संचालक व लोकनियुक्त सरपंच प्रकाश पाटील यांनी संस्थेचा कामाचा आढावा घेत गोकुळच्या संचालकांच्या सह आमदार पाटील यांच्याकडे गावातील तरुणांना गोकुळ मध्ये समावून घेण्याची मागणी केली.

तरुणांना रोजगार मिळवून देणार असल्याचे सांगितले यावेळी या कार्यक्रमास उपसरपंच रुपाली धनगर जनार्दन पाटील हंबीरराव पाटील दत्तात्रय पाटील अमर पाटील विशाल पाटील अरविंद पाटील मोहण सोरटे राहुल पाटील प्रदिप चौगुले रायगोडा पुजारी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांचे चेअरमन व्हायचेअरमन संचालक व तरुण मंडळातील पदाधिकारी महिला बचत गटा महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments