Friday, March 29, 2024
HomeMarathi News TodayIND vs PAK | पाकिस्तानला आणखी एक झटका…आफ्रिदीपाठोपाठ वसीमही आऊट…या खतरनाक गोलंदाजाचे...

IND vs PAK | पाकिस्तानला आणखी एक झटका…आफ्रिदीपाठोपाठ वसीमही आऊट…या खतरनाक गोलंदाजाचे पुनरागमन…

Share

IND vs PAK – आशिया चषक स्पर्धेत उद्या रविवारी भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. शाहीन आफ्रिदीच्या बाहेर पडल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरनेही टीम बाहेर असणार आहे. वसीम दुखापतीमुळे स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या जागी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियर पाठीच्या दुखण्यामुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बुधवारी पाकिस्तानच्या सराव सत्रात गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. त्याची दुखापत संघातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. दुबईतील एमआरआय स्कॅनमध्ये दुखापतीची पुष्टी झाली. वैद्यकीय पथक वसीमच्या पुनर्वसनावर बारीक लक्ष ठेवणार आहे. त्याची जागा हसन अली संघात घेणार आहे.

वसीमने गेल्या सामन्यात चार विकेट घेतल्या होत्या
मोहम्मद वसीम हा पाकिस्तानच्या T20 संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. या वर्षी त्याने आपल्या देशासाठी सर्व एकदिवसीय आणि टी-20 सामने खेळले आहेत. त्याने पाकिस्तानकडून शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत 36 धावांत चार बळी घेतले. अशा परिस्थितीत फॉर्मात असलेल्या वसीमच्या जाण्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

हसन अलीने टी-20 विश्वचषकात भारताविरुद्ध दोन विकेट घेतल्या होत्या
हसन अलीबद्दल बोलायचे तर तो पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज आहे. तो भारताविरुद्धही खेळला आहे. त्याने 49 टी-20 सामन्यात 60 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या टी-२०मध्ये त्याने दोन विकेट घेतल्या आहेत. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात हा सामना खेळला गेला होता. त्यानंतर टीम इंडियाचा पराभव झाला. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात हसन अलीने सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजा यांना बाद केले.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, इफ्तिखार अहमद, उस्मान कादिर, फखर जमान, हरिस रौफ, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, हसन अली, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहनवाज राइट .


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: