Friday, April 19, 2024
Homeराज्यसांगली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विविध पक्ष संघटनांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन :- प्रशांतभाऊ...

सांगली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विविध पक्ष संघटनांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन :- प्रशांतभाऊ सदामते…

Share

सांगली – ज्योती मोरे

दिनांक 28 जुलै मिरज तालुक्यातील मौजे सोनी गावातील प्रकल्पग्रस्त मातंग समाजाला न्याय देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यलयासमोर विविध पक्ष संघटनांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन:-प्रशांतभाऊ सदामते मौजे सोनी तालुका मिरज येथील मागासवर्गीय मातंग समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी-शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोकळे साईट सोनी चे चेअरमन शैलजा प्रकाश पाटील यांचे नावे प्रकल्प होण्यासाठी कवडीमोल किमतीत खरेदी केल्या,

परंतु गेली 25 वर्षांपासून तिथे प्रकल्प न उभा करता त्या जांनींच्यावर विविध बँकेचे 3.25 कोटी रुपयांची कर्जे उचलून जमिनी बँकेच्या घशात घातल्या तसेच शेतकऱ्यांना कारखान्यात काम देण्याचे लेखी पत्र देण्यात आली होती परंतु अद्याप त्या ठिकाणी कारखाना उभाच राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या होत्या पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांची फसवणूक झाली,

चार दिवसांपूर्वी कारखाना परिसरात मातंग समाजातील शेतकरी आमच्या घेतलेल्या जमिनींचे व कामाचे काय झालं हे विचारण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी विशाल पाटील यांनी पाठवेलेल्या गुंडांनी व व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळ कारखाना व्यवस्थापनावर नऊ जनांच्यावर जात प्रतिबंधक कायद्यानुसार मंगळवारी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

परंतु शेतकऱ्यांची जमीन दंडुकशाही पध्दतीने बळकावून बँकेच्या घशात घालून फसवणूक झाल्याने व कारखान्यात नोकरीचे खोटे आश्वासन दिल्याने मुख्य आरोपी कारखाना संचालक शैलजा प्रकाश पाटील व त्या जांनींच्यावर बँकेचा बोजा असताना कारखान्याचा कोणताही संबंध नसताना कारखाना परिसरात गुंड पाठवून मागासवर्गीय मातंग समाजातील कुटुंबांच्यावर दहशतिचे वातावरण पसरवून धमकी दिल्याने या दोघांनाही मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झलेल्या अट्रॉसिटी गुन्ह्यात मुख्य आरोपी करण्यात यावे तसेच,

वेळेत प्रकल्प पूर्ण न झाल्याने मातंग समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या खरेदी रद्द करून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यात याव्यात व 25 वर्षापासून आत्तापर्यंत बेरोजगार व भूमिहीन झालेल्या मातंग समाजातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी व इतर मागण्यांसाठी सोनी गावातील मातंग समाजातील प्रकल्पग्रस्त शेतकरी कटुंबांना घेऊन बेमुदत धरणे आंदोलन आज पहिला दिवस होता यावेळी मार्केट कमिटीचे सभापती मा दिनकर तात्या पाटील,

चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मा.आकाश तिवडे,मा.हेमंत मोहिते मातंग सेवा संघ प्रदेशाध्यक्ष, मा.प्रशांत आवळे डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे चे सांगली जिल्हा अध्यक्ष या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते व मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: