संभाजी ब्रिगेड आक्रमक खातेनिहाय चौकशीची मागणी…
सांगली – ज्योती मोरे
येरळा नदी पात्रातील वाळू तस्करी रोखण्यासाठी नेमलेल्या पथकातील अनुपस्थित मडल अधिकारी सह पथकातील मद्यधुंद अवस्थेत ड्यूटीवर असणाऱ्या तूरची तलाठी सतीश कुंभार,झिरो तलाठी पोपट पोतदार,यासह पथकातील इतर तलाठी व कोतवाल यांचीही खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबित करावे.मागणीसाठी आज तासगांव संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रांत कार्यालयसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी रात्री तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी येरळा व अग्रणी नदी पात्रातील वाळू तस्करी रोखण्यासाठी गस्ती पथक नेमले होते.सदर पथकाचे पथक प्रमुख राजश्री सानप, तलाठी सतीश कुंभार (तुरची तलाठी), शरद गुरव (जरडी तलाठी,), तानाजी फराकट्टे (आरवडे तलाठी), बाळासो मुजावर (सवर्ड कोतवाल),विजय देशमुख जरंडी कोतवाल,यांच्यावर वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी होती.
यावेळी पथकातील तलाठी सतीश कुंभार हे दारू पिऊन गाडीवरून पडले.त्यामुळे कामावर असताना कामात मद्यप्राशन करून बेजबाबदारपणे वागणे.मनमानी कारभार करणाऱ्या तलाठी सतिश कुंभार यांना तात्काळ निलंबित करावे. सतिश कुंभार हे वाळू माफियाकडून हफ्ते घेतात.म्हणूनच वाळू तस्करी रोखण्यात अपयश येत आहे.तेंव्हा शुक्रवारी रात्रीच्या गस्ती पथकातील उपस्थित व अनुपस्थित सर्व अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी.
व दोषिवर कडक कारवाई करत प्रशासनातून निलंबित करावे.मागणीसाठी मिरज प्रांताधिकारी यांचे कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 9 जून 2022 रोजी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.यावेळी तासगाव तालुका अध्यक्ष प्रशांत केदार,जिल्हा उपाध्यक्ष विशाल रेनूसे,तमा दोडमनी,विजय खराडे,संजय देवकुळे,विनायक विनायक साळसकर,सुनील मोरे आदी उपस्थित होते.