Friday, April 19, 2024
HomeFoodsइन्फिनिक्सने प्रिमिअम अँड्रॉईड टीव्हींची श्रेणी लॉन्च केली...

इन्फिनिक्सने प्रिमिअम अँड्रॉईड टीव्हींची श्रेणी लॉन्च केली…

Share

झीरो ५५ इंच क्यूएलईडी यूएचडीसह ५० इंच एक्स३ यूएचडी लॉन्च.

अँड्रॉईड स्मार्ट टीव्हींच्या किफायतशीर श्रेणीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज भारतात प्रिमिअम अँड्रॉईड टीव्हींची श्रेणी लॉन्च केली आहे. या श्रेणीअंतर्गत ब्रॅण्डने झीरो सिरीजअंतर्गत पहिला ५५-इंच क्यूएलईडी ४के टीव्ही लॉन्च केला.

या टीव्हीमध्ये उल्लेखनीय क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञान आहे आणि या टीव्हीची किंमत फक्त ३४९९० रूपये आहे. इन्फिनिक्स आपल्या विद्यमान एक्स३ सिरीजअंतर्गत ५०-इंच ४के टीव्ही देखील सादर करत आहे. या टीव्हीमध्ये सर्वात सुरक्षित व्युईंग अनुभवासह डॉल्बी ऑडिओ आहे आणि या टीव्हीची किंमत फक्त २४९९० रूपये आहे. दोन्ही अँड्रॉईड टीव्हींची विक्री २४ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर होण्याची अपेक्षा आहे.

इन्फिनिक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कपूर म्हणाले, “आम्ही २०२० मध्ये स्मार्ट टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला आणि तेव्हापासून आम्हाला आमच्या अँड्रॉईड टीव्हींच्या एक्स१ व एक्स३ सिरीजला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे, तसेच आम्ही सेगमेंटमध्ये स्वतःला चांगले स्थापित केले आहे. झीरो सिरीज लाँच करून आम्ही प्रीमियम आमच्या अँड्रॉईड टीव्ही क्षेत्रात धुमाकूळ निर्माण करू इच्छितो.

बाजारपेठेत नवीन तंत्रज्ञान सादर करण्याचा इतिहास असल्याने आम्हाला विश्वास आहे की, आमचे प्रमुख क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञान असलेला आमचा नवीन ५५-इंच क्यूएलईडी ४के टीव्ही तंत्रज्ञानाच्या भविष्यात गेम चेंजर असेल. ५५-इंच मॉडेलसह आम्ही प्रीमियम क्यूएलईडी स्मार्ट टीव्ही विभागातील एक प्रबळ प्रतिस्पर्धी असू. इन्फिनिक्स झीरो सिरीजमध्ये प्रमाणित गुगल टीव्हीसह प्रखर व सुस्पष्ट डिस्प्लेचे परिपूर्ण संयोजन,

सुरक्षित व्युईंग अनुभव, सुधारित साऊंड क्‍वॉलिटी आणि शक्तिशाली प्रोसेसर आहे. ग्राहक-केंद्रित ब्रॅण्ड म्हणून आम्ही ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आणि इन्फिनिक्स झीरो क्यूएलईडी टीव्ही सिरीजचे लॉन्च लाखो ग्राहकांच्या सर्वसमावेशक मनोरंजन गरजांची पूर्तता करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”

बेझल-लेस मिनिमलिस्टिक डिस्प्ले व डिझाइन: झीरो ५५-इंच क्यूएलईडी ४के टीव्हीमध्ये प्रीमियम डिझाइनसह इन्फिनिक्सचे प्रमुख क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञान व अत्‍यंत अचूक ४के डिटेल्स आहेत. तसेच या टीव्हीमध्ये तुमच्या आवडत्या टीव्ही मालिका, क्रीडा सामने व चित्रपटांच्या फ्रेम रेटला चालना देण्यासाठी आणि सुस्पष्टपणे दिसण्यासाठी डॉल्बी व्हिजन, एचडीआर१०+ सपोर्ट व ६० एफपीएस एमईएमसी आहे.

तसेच ५०-इंच ५०एक्स३ ४के टीव्हीमध्ये एचडीआर१० कम्पॅटिबिलिटी आणि ८५ टक्के एनटीएससीचे पाठबळ असलेले १.०७ बिलियन रंग, १२२ टक्के सुपर आरजीबी कलर गम्यूट व जवळपास ३०० नीट्स पीक ब्राइटनेस आहे, ज्यामधून अधिक वास्तववादी व्हिज्युअल्सची खात्री मिळते.

सर्वोत्तम साऊंड क्वॉलिटी: झीरो ५५-इंच क्यूएलईडी ४के टीव्हीमध्ये दोन शक्तिशाली इन-बिल्‍ट ३६ वॅट बॉक्स स्पीकर्ससह डॉल्बी डिजिटल ऑडिओ व २ ट्विटर्स आहेत, ज्यामधून ८ हजार ते २० हजार हर्टझपर्यंतच्या रेंजमध्ये उत्तम दर्जाच्या साऊंडचा अनुभव मिळतो. ५०-इंच ५०एक्स३ टीव्हीमध्ये २४ वॅट बॉक्स स्पीकर्ससह डॉल्बी ऑडिओचे शक्तिशाली संयोजन आहे, ज्यामधून संपन्‍न, सुस्पष्ट, शक्तिशाली सिनेमॅटिक सराऊंड साऊंड अनुभव मिळतो.

शक्तिशाली कार्यक्षमता: ५५-इंच क्यूएलईडी अँड्रॉईड टीव्हीमध्ये मीडियाटेक क्वॉड-कोअर सीए५५ प्रोसेसरची शक्ती, तसेच २ जीबी रॅम व १६ जीबी रॉम आहे. दुसरीकडे इन्फिनिक्स ५०-इंच ५०एक्स३ टीव्हीमध्ये मीडियाटेक क्वॉड-कोअर प्रोसेसरची शक्ती, तसेच १.५ जीबी रॅम व १६ जीबी रॉम आहे. सॉफ्टवेअर संदर्भात दोन्ही टीव्हींमध्ये अँड्रॉईड ११ ओएस आहे. यामधून प्रेक्षकांना उच्च कार्यक्षमतेचा आनंद मिळण्यासोबत कमी वीजेचा वापर होण्याची खात्री मिळते.

सुधारित कनेक्टीव्हीटी: इन्फिनिक्सने लॉन्च केलेल्या दोन्ही टीव्हींमध्ये सुधारित कनेक्टीव्हीटीसाठी अनेक पोर्ट पर्याय आहेत. झीरो ५५-इंच क्यूएलईडी अँड्रॉईड टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय (१ एआरसी सपोर्ट), २ यूएसबी पोर्टस्, ५.० ब्ल्यूटूथ, वाय-फाय बी/जी/एन, १ एव्ही इनपूट, १ लॅन, १ हेडफोन पोर्ट आणि ड्युअल बॅण्ड वाय-फाय पोर्ट्स आहेत, तर ५०-इंच ५०एक्स३ टीव्हीमध्ये ३ एचडीएमआय पोर्टस्, २ यूएसबी पोर्ट्स आणि एक ड्युअल बॅण्ड वाय-फाय आहे.

प्रमाणित अँड्रॉईड: दोन्ही अँड्रॉईड टीव्हींमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, यूट्यूब असे तुमचे आवडते व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप्स आणि अॅप स्टोअरमधील ५००० हून अधिक अॅप्सशी एकसंधी कनेक्टीव्हीटीकरिता बिल्ट–इन क्रोमकास्ट आहे. तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून नाचण्याचा, रेसट्रॅकवरील थराराचा आनंद घेऊ शकता आणि मोठ्या स्क्रिनवर कोणत्याही अॅक्शनला पाहताना कंट्रोलर्स म्हणून स्मार्टफोनचा वापर करू शकता. तसेच वन-टच गुगल असिस्टण्ट असलेला ब्ल्यूटूथ-सक्षम स्लिम रिमोट वैयक्तिकृत व हँड्स-फ्री अनुभव देतो.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: