Tuesday, April 23, 2024
Homeराज्यखिंडसी तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या - इसम बालाघाटचा...

खिंडसी तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या – इसम बालाघाटचा…

Share

रामटेक – राजू कापसे

रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या तथा रामटेक – तुमसर मार्गावरील खिंडसी जलाशयात बालाघाट येथील इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि.२७ ऑगस्टला दुपारी साडेचार – पाच च्या सुमारास घडली.

जनक कावळे असे मृतकाचे नाव असुन तो बालाघाट येथील रहीवाशी आहे. पोलीस स्टेशन, रामटेक येथुन प्राप्त माहितीनुसार काल दि. २७ ऑगस्ट ला दुपारी साडेचार ते पाच वाजता दरम्यान बालाघाट येथील रहीवाशी असलेले जनक कावळे नामक व्यक्तीने रामटेक – तुमसर मार्गावर असलेल्या खिंडसी जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली.

रामटेक पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व मृतदेहाची शोधाशोध केली असता मृतदेह मिळुन आला नाही. त्यानंतर आज दि. २८ ऑगस्टला शोधाशोध केली असता मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळुन आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. इसमाच्या आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असुन पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: