HomeUncategorizedआयवूमी एनर्जीने ई-स्कूटर जीतएक्स सादर केली...

आयवूमी एनर्जीने ई-स्कूटर जीतएक्स सादर केली…

जीतएक्स आणि जीतएक्स१८० च्या प्रत्येक चार्जसोबत ९० आणि १८० किलोमीटर्सची रेन्ज… 

भारतातील एक सर्वात वेगाने विकसित होत असलेली इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आयवूमी एनर्जीने सादर केली आहे जीतएक्स, एक्स्ट्रा पॉवर असलेली ही ई-स्कूटर हाय-स्पीड देणारी असून आरटीओ रजिस्टर्ड आहे.  आयवूमी एनर्जीची ही ई-स्कूटर भारतात, भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.  ७० केएमपीएच स्पीड देणाऱ्या जीतएक्सला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने प्रमाणित केले आहे. 

ही ई-स्कूटर अतिशय टिकाऊ आहे.  जीतएक्स आणि जीतएक्स१८० हे दोन प्रकार कंपनी आणणार आहे.  इको मोडमध्ये जीतएक्स प्रत्येक चार्जसोबत १०० पेक्षा जास्त किमी रेंज देते तर रायडर मोडमध्ये ९० पेक्षा जास्त किमीची रेंज मिळते.  जीतएक्स१८० इको मोडमध्ये २०० पेक्षा जास्त किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये १८० पेक्षा जास्त किमीची रेंज देते. किंमत ९९,९९९ रुपये.

जीतएक्ससोबत ऍक्सेसरी म्हणून ड्युएल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देण्याची देखील घोषणा कंपनीने केली आहे.  हे सेटअप त्यांच्या आधीच्या हाय-स्पीड आईवूमी एस१ मॉडेलसोबत आणि इतर लो-स्पीड व्हेरियंट्ससोबत, आयवूमीच्या सर्व ई-स्कूटरची रेंज वाढवण्यासाठी वापरले जाऊ शकते.  यामुळे त्यांचे सध्याचे युजर्स आपल्या ई-स्कूटरना या ड्युएल बॅटरी कॉन्फिगरेशनसह अपग्रेड करू शकतील.  या घोषणेमुळे ही कंपनी भारतातील पहिली अशी कंपनी बनली आहे जी आपल्या सर्व ई-स्कूटरसोबत ड्युएल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देत आहे. 

तसेच आईवूमीच्या स्कूटर आधीपासून वापरत असलेल्या युजर्सना त्यांच्या ई-स्कूटरना कोर बॅटरी लेवलपर्यंत अपग्रेड करण्याची संधी दिली जात आहे, पुढील चार्जिंग आणि ऍक्सेसिबिलीटीसाठी याला काढून ठेवले जाऊ शकते. 

आयवूमीचे एमडी आणि सह-संस्थापक श्री. सुनील बन्सल म्हणाले, “देशात विकसित करण्यात आलेल्या इनोव्हेशन्ससह आईवूमीमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी नव्या सुविधा, नवे लाभ आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो.  भारतातील स्थिती विचारात घेऊन सर्वात चांगली ईव्ही आणण्यासाठी, आपल्या संशोधन व विकासाला सदैव पुढे नेत कंपनी स्टेबिलायजेशन मोडमध्ये आहे.  आम्ही असे मानतो की, एक्स्ट्रा पॉवर असलेल्या, आपल्या देशात तयार करण्यात आलेल्या ई-स्कूटर लोकांची रेंजबद्दलची चिंता दूर कार्नाय्त आणि इलेक्ट्रिक वाहनांविषयीचा विश्वास वाढवण्यात मदत करतील.”

कामगिरी आणि किमतीचे मूल्य या दोन बाबी डोळ्यासमोर ठेवून, परिपूर्णता हे उद्दिष्ट मानून इंजिनीयर करण्यात आलेल्या या ई-स्कूटरमध्ये  चालवत असताना मोड सहज स्विच करता यावा यासाठी “ईझी शिफ्ट” सारख्या आधुनिक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, सुविधाजनक व सुरक्षित रिव्हर्स गियर्स, अधिक सुरक्षेसाठी कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम (सीबीएस) असल्याने अचानक ब्रेक लावल्याने उत्पन्न होणारा प्रभाव आणि गाडी थांबण्यासाठी लागणारा वेळ देखील कमी होतो.  यामध्ये एक टचलेस फूटरेस्ट देखील असते जे न वाकता आणि हातांचा उपयोग न करता देखील बाहेर काढले व आत ढकलले जाऊ शकते.  याशिवाय आयवूमी जीतएक्स बॅटरीसोबत ३ वर्षांची वॉरंटी दिली जाते. 

सर्वोत्तम, प्रीमियम लुक आणि डिझाईनसह, मोठी ईव्ही सर्व आकार व आकारमानांच्या भारतीयांसाठी उपयुक्त आहे.  आयवूमी एनर्जी ही अशा काही मोजक्या ई-स्कूटर उत्पादकांपैकी एक आहे जे प्रत्येक राईडमध्ये १०० पेक्षा जास्त किमीच्या उत्तम रेंजसह एक मोठी बूट स्पेस देतात.  ई-स्कूटरमध्ये चार मॅट रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत – शार्लेट रेड, इंक ब्ल्यू, पॉश व्हाईट आणि स्पेस ग्रे. जीतएक्स जवळच्या आयवूमी डीलरशिपकडे खरेदी करता येईल आणि ग्राहकांनी निवडलेल्या पर्यायांनुसार १ लाख ते १.४ लाख रुपयांपर्यंत तिची किंमत असेल. 

जीतएक्स सीरिजची बुकिंग १ सप्टेंबरपासून सुरु होत आहे आणि गाडी त्याच तारखेपासून उपलब्ध होईल. जीतएक्स१८० सप्टेंबरच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल. सर्वात आधी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आयवूमीतर्फे नव्या व्हेरियंटसह १० सप्टेंबर २०२२ पर्यंत ३००० रुपयांच्या ऍक्सेसरीज मोफत दिल्या जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments