Saturday, April 27, 2024
Homeखेळतालुकास्तरीय नरखेड अंतर्गत झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जीवन विकास विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड...

तालुकास्तरीय नरखेड अंतर्गत झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत जीवन विकास विद्यालयाची जिल्हास्तरावर निवड…

Share

अतुल दंढारे
नरखेड -25

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर द्वारा आयोजित नरखेड तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावणे, गोळा फेक,भाला फेक,थाळी फेक या खेळामध्ये जीवन विकास विद्यालय,देवग्राम च्या स्पर्धकांनी अत्यंत चुरशीच्या सामन्यात फायनल मॅच जिंकून त्यांची जिल्हास्तरावर,नागपुर करिता निवड करण्यात आली. 100 मीटर धावणीत 14 वर्ष वयोगटात रोहन माथुरकर ची निवड झाली.

200 मीटर धावणीत लतिका लोहे हिची द्वितीय क्रमांकाने निवड झाली.भाला फेक मध्ये 14 वर्ष वयोगटातील लक्की कोहळे आणि 17 वर्ष वयोगटातील प्राजक्त धोटे यांची निवड झाली. गोळा फेक मध्ये 14 वर्ष वयोगटातील वेदिका ठोंबरे,रेणुका वासाडे,17 वर्षं वयोगटातील जान्हवी कोहळे,निवेदिता तायवाडे,भावेश चरपे यांची निवड झाली. थाळी फेक या स्पर्धेत 17 वर्षं वयोगटातील वैष्णवी वासाडे,वैभव कुंभारे यांची निवड झाली.

त्याबद्दल अंत्योदय मिशन ,देवग्राम या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब भोगे , संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाष्करराव विघे ,जीवन विकास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगाडे , जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रामभाऊ बोन्द्रे , क्रीडा शिक्षक श्री मंगेश निंबुरकर ,कराटे सेन्सॉई कोच श्री नरेंद्र बिहार,जीवन विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री रविकांत बाविस्कर, तसेच सर्वच शिक्षक बंधू भगिनींनी विजयी टीम चे अभिनंदन आणि कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: