Homeग्रामीणतालिबानी अधिकाऱ्याविरुद्ध पत्रकारांची न्यायासाठीलढाई…"जिंकू किंवा मरू "राज्यव्यापी आंदोलन…

तालिबानी अधिकाऱ्याविरुद्ध पत्रकारांची न्यायासाठीलढाई…”जिंकू किंवा मरू “राज्यव्यापी आंदोलन…

वर्धा – यवतमाळ-नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयाचा गौण खनिज कुठलीही शासकीय परवानगी न घेता खुल्या बाजारात विकल्या संदर्भात गेल्या दोन वर्षापासून तक्रारदार/पत्रकार अमोल कोमावार यांनी सतत पाठपुरावा करून संपूर्ण भ्रष्टाचाराचा सुनावणी दरम्यान खुलासा केला. परंतु आजपर्यंत कुठल्याही दोषींवर कारवाई झालेली नाही. याउलट पत्रकाराला कुठल्यातरी प्रकरणात गोण्याचा किंवा त्याच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.

सविस्तर वृत्त असे की, वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या चालू आहे परंतु या रेल्वे प्रकल्पाच्या कामात अनेक गैरप्रकार चालू असल्याचे निदर्शनास आणून दिले गेले. या रेल्वे कामाचे कंत्राटदार आर भरत रेड्डी कंस्ट्रक्शन यांना व हर्षिता कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले. या लोकांनी शासनाच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची हात मिळवणे करून अनेक गैरप्रकार करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला. यासंबंधीतील तक्रारी तसेच जाय मोक्यावर जाऊन पुराव्यानेशी सर्व भोंगळ कारभार पकडून दिल्यानंतर सुद्धा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कंत्राट दाराशी संगणमत करून प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार पत्रकार अमोल कोमावार यांचेवर प्रचंड दडपण आणून त्यांना जीवनीशी मारण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा हमले गेलेत त्यांना गोण्यासाठी खोटे नाते रिपोर्ट अशा सारखे सर्व प्रकार केले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दखल घेता सर्व पत्रकारांनी एकवटून या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लढा पुकारला.

त्यामुळे ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र व नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तालिबानी भ्रष्टाचारी शासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला गेला. ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष गजानन जी वाघमारे व नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट राज्य अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी यांच्या मार्गदर्शनात त्याचबरोबर गोपाल नारे यांच्या खंबीर नेतृत्वात ह्या आंदोलनाची सुरुवात करून समस्त अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देऊन जिंकू किंवा मरू या राज्यव्यापी आंदोलनाला दिनांक 29 8 2022 रोजी करण्याचे आयोजन केलेले आहे.

तालिबानी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणून दोषींवर कारवाईसाठी तसेच पत्रकारावर झालेल्या अन्यायाविरुद्ध पत्रकाराची म्हणजेच लोकशाहीची मुस्कटदाबी करणाऱ्याला चोप देण्यासाठी.. पत्रकाराला न्याय देण्यासाठी हे आंदोलन यवतमाळ येथे होत आहे. या आंदोलनामध्ये संपूर्ण राज्यातल्या सर्व जिल्ह्यातून तालुक्यातून पत्रकारांनी मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या कवी निवेदनाद्वारे कळविले परंतु आजपर्यंत सरकारने कुठलेही कारवाईचे पाऊल सरकारी अधिकाऱ्याविरुद्ध उचललेले नाही. त्यामुळे तालिबानी भ्रष्टाचारी हुकूमशाही अधिकाऱ्यांविरुद्ध पत्रकारांच्या लोकशाही लढ्यामध्ये सरकारची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्यांचे लक्ष लागलेले आहे.

पत्रकार संघटनेचे उपस्थित पदाधिकारी
गजानन वाघमारे प्रदेशाध्यक्ष
राजेश जी दांगटे राज्य सचिव
अनंत गावंडे राज्य प्रवक्ते
अमोल कोमावार राज्य समन्वयक
गोपाल नारे विभागीय संघटक
सादिक शहा अमरावती जिल्हाध्यक्ष
प्रवीण झुलेकर अमरावती कार्याध्यक्ष
विकी बाबुळकर अमरावती उपशहर प्रमुख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments