Homeराज्यस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आकोट पोलीस ठाण्यात जल्लोषाचे वातावरण...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य आकोट पोलीस ठाण्यात जल्लोषाचे वातावरण…

संपूर्ण देशात साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमी वर आकोट शहर पोलीस ठाण्यात अधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी अतिशय उत्साहाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय उत्सव साजरा केला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आकोट शहर पोलीस ठाण्याचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये शहरातील विविध स्तरातील नागरिक व विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

श्री शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी अंकुश बोडखे, प्रज्वल नेमाडे, योगेश टाकळकर, वैभव नितोने, अभी काकड, प्रतीक कुलट, पवन ठाकरे, अमृत पालेकर, आकांक्षा राऊत व दिव्या भारसाकळे यांनी त्यांचे प्रशिक्षक निखिल भगवान वानखडे यांचे नेतृत्वात नेत्र दीपक योगासने व लेझीमचे खेळ केलेत. आठ वर्षे चिमुरडी कुमारी वृषाली तायडे हिच्या दमदार आवाजातील गीतांनी श्रोत्यांना रोमांचित केले. यासोबतच मेलोडी ग्रुप आकोटचे योगेश वर्मा,संजय भुतडा, कु. चंचल पितांबर वाले,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर, पोलीस हेड कॉन्स्टेबल हिम्मत दंदी, श्रीकृष्ण वानखडे, दीपक तळोकार,प्रमोद येऊल, सिद्धांत वानखडे व विनोद रसे यांनी देशभक्तीपर गीते सादर करून संपूर्ण वातावरण भारून टाकले.

सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. ठीक अकरा वाजता सर्व उपस्थितांकडून राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे भूषण सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज, माजी आमदार संजय गावंडे, कैलास गोंडचर, संजय आठवले, माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम चौखंडे, कॅप्टन सुनील डोबाळे, कु. चंचल पितांबर वाले, सुभाष तेलगोटे, सदानंद तेलगोटे, गणेश वाकोडे, एडवोकेट मनोज वर्मा, कदीरशा, राजू तेलगोटे, प्रतापसिंग सोळंके, पेंटर वसी, किरण भडंग, जावेद अली मिर साहेब, अरुण काकड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सफल आयोजन आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, आकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश अहिरे, आकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ठोंबरे, राजेश जवरे, गणेश पाचपोर, रत्नदीप पळसपगार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गायकी यांनी तर आभार प्रदर्शन ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments