Thursday, April 25, 2024
Homeराज्यखामगाव | युवासेनेच्या वतीने विविध समस्यांसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून दिला आंदोलनाचा...

खामगाव | युवासेनेच्या वतीने विविध समस्यांसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देवून दिला आंदोलनाचा ईशारा…

Share

आज खामगाव नगरपरिषद येथे मुख्याधिकारी श्री अकोटकर यांना विविध समस्यांसाठी युवासेना शहर प्रमुख संतोष सावंग यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले या निवेदनात
खामंगाव नगर परिषद हंद्दी मधील मा.नगरसेवक अनिस जमादार यांच्या प्रभाग १२ मंध्ये जनतेला मुलभूत गरजापासुन वंचित राहवे लागत आहे.या भागात सर्वात मोठी समस्या ही शौचालया बाबत आहे.

शौचालयात प्रभाग आहे की प्रभागात शौचालय हे समजायला मार्ग नाही.सफाई कामगार या भागात शौचालय साफसफाईला दहा दहा विस विस दिवस येत नाही.त्यामुळे महिला वर्गाची खुप मोठी कुचंबना होत आहे.घाणीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की घरा पर्यत घाणीतील किडे यायला सुरुवात झालेली आहे.लहान मुलांच्यासह जेष्ठ नागरिकांच्या तब्येतीत वाईट परिणाम दिसुन येत आहे.या भागातील रस्त्यावरील स्ट्रिट लाईट बर्याचं दिवसा पासुन बंद आहेत.नाल्या तुडूंब भरुन घाण बाहेर येत आहे.ज्यामुळे जनतेच्या आरोग्या बाबत शासनाच्या व नगरपरिषदच्या कार्यप्रणालीवर शंका उत्पन्न होत आहे.तसेच प्रभाग ५ मंध्ये स्मशानभूमी रोडवर घाणीचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आहे.आजुबाजुच्या काटेरी झाडांच्या फांद्या रोडवर आल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.रस्त्यावर घाण साचलेली आहे.मा.नगरसेवकांच्याकडे या बाबत जनतेने तक्रार केल्यास आमचा कार्यकाळ संपला या प्रकारची उत्तरे मिळतात.

आपणास विनंती आहे आपण स्वताहा या प्रकरणी लक्ष देवुन जनतेच्या आयुष्यसोबत चाललेला दिरंगाईपणा बंद करावा व जनतेला मुलभूत सुविधा पुरविण्यास,मिळवण्यास मदत करावी.अंन्यथा प्रभाग १२ व ५ मधील नागरिक खामंगाव नगरपरिषद विरोधात लोकशाही पध्दतीने विविध आदोलन करण्यास भाग पडेल व यांची संपूर्ण जवाबदारी खामंगाव नगरपरिषदची राहील. आदी बाबी नमूद आहेत ह्या समई संतोष सावंग युवासेना शहर प्रमुख, शंकर खराडे वाहतूक सेना तालुका प्रमुख, संतोष करे शिवसेना शहर उपप्रमुख आदींसह करकर्ते उपस्थित होते


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: