Homeगुन्हेगारीअपहृत अल्पवयीन मुलाला आकोट ग्रामिण पोलिसांनी आणले राजस्थान वरून परत...

अपहृत अल्पवयीन मुलाला आकोट ग्रामिण पोलिसांनी आणले राजस्थान वरून परत…

पोलिस स्टेशन आकोट ग्रामीण येथे फिर्यादी नामे सुल्ताना बी (नाव बदललेले) रा. पणज यांनी तक्रार दिली की, त्यांचा जावई नामे सलीम खा अन्वर खा, रा. नुहुंद, ता. राजगड, जि. चुरू राजस्थान याने त्यांचा मुलगा नामे शेख फरहान( नाव बदलले) रा. पणज वय ७ वर्ष यास फिर्यादी यांचे संमतीशिवाय राजस्थान येथे पळवून नेले व त्याचे काहीतरी बरेवाईट करून करून टाकण्याची धमकी दिली.

फिर्यादी चे ह्या तक्रारिवरून वरून पो. स्टे. आकोट ग्रामीण येथे अप क्र. 319/2022 कलम 363, 506 भा द वि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट रितू खोखर,व पो. स्टे. आकोट ग्रामीणचे ठाणेदार नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विष्णु बोडखे सोबत Npc हरीश सोनवणे, pc गोपाल जाधव, यांनी राजस्थान येथे जाऊन पीडित मुलगा वय ७ वर्ष रा. पणज याचा राजस्थान येथे शोध घेऊन त्यास शिताफीने ताब्यात परत आणले.

नंतर त्याला बाल कल्याण समितीचे समोर हजर करून बाल कल्याण समितीचे आदेशाने त्याचे आईचे ताब्यात देण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णु बोडखे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments