कागल; प्रतिनिधी…
पिंपळगाव (खुर्द ) ता.कागल येथील 30 वर्षीय तरुणांकडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी,मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना दि.13 रोजी घटना घडली आहे…
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पिंपळगाव (खुर्द ) ता.कागल येथील रहिवासी श्रेयस बाबासो कांबळे हा तरुण सोमवार दि.13 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पुणे बंगळूर महामार्ग लक्ष्मी टेकडीहुन कागल कडे महामार्गवरुन येत असताना येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका येथे आले असता लक्ष्मी टेकडीकडून पाठीमागे आलेल्या तीन अनोळखी अज्ञात ईसम एका दुचाकीवरून पुढे येत श्रेयस कांबळे याची गाडी थांबवून त्यांच्या जवळील गाडी व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे.सदर घटनेबाबत पिडीत कांबळे यांनी कागल पोलीसात धाव घेऊन घडल्या प्रकरणाबाबत फिर्याद दिली असुन पोलीसांकडुन त्या अज्ञात फरारी चोरट्यावर भारतीय दंड संहिता कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.या घडलेल्या प्रकारामुळे दुचाकी प्रवास करणाऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे..