Homeखेळझोनल स्तरावरील क्रीडा स्पर्धेत कोगनोळी हायस्कूलला मिळाले यश...

झोनल स्तरावरील क्रीडा स्पर्धेत कोगनोळी हायस्कूलला मिळाले यश…

कोगनोळी ; प्रतिनिधी…
कुर्ली ता.निपाणी येथील दृष्टी काँन्वेंट इग्लिश मिडीयम स्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या सौंदलगा झोनल पातळीवरील क्रीडा स्पर्धेत विरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल कोगनोळी येथील गौरव गजानन सुतार या विद्यार्थ्यांने 100मीटर धावणे आणि उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली असुन पुढील तालुका स्तरावरील स्पर्धेत निवड झाली आहे..

त्याचबरोबर अथर्व निलेश साखरे या विद्यार्थ्यांने गोळा फेक स्पर्धेत तृतीय क्रमांक व समर्थ दिलिप कोळी या विद्यार्थ्यांने लांब उडी स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला आहे.या मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रितम विरकुमार पाटील यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तर मुख्याध्यापक एस एन अलगुरे सर यांना गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.यामध्ये संघ व्यवस्थापन म्हणून आर ए डोंगरे,सर आणि वर्षा नवाळे यांनी काम पाहिले.याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments