HomeFeaturedराज्यराष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी कोमल तायडे तसेच पंकज सावळेयांची मुर्तिजापूर...

राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी कोमल तायडे तसेच पंकज सावळेयांची मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली…

गुरू संत रविदास महाराज यांच्या फोटो पुजन तसेच हार अर्पन करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनराव घोलप साहेब यांच्या अध्यक्ष ते खाली अकोला येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळयात मुर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कोमल सुरेश तायडे यांची अकोला जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच पंकज ओंकारराव सावळे यांची मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बबनराव घोलप (राष्ट्रीय अध्यक्ष) आणि वर्षाताई गजानन वजीरे (जि.प.सदस्य, अकोला) तसेच प्रमुख पाहुणे श्री.भानुदासजी विसावे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, श्री. रविंद्रजी राजुसकर (राष्ट्रीय प्रवक्ता), श्री.गजाननभाऊ भटकर (विदर्भ प्रमुख), श्री. रामाभाऊ उंबरकर (पश्चिम विदर्भ प्रमुख युवा), तसेच जिल्हाध्यक्ष श्री. प्रविणभाऊ चोपडे आणि महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिरभाते प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात २०० हुन अधिक चर्मकार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गुण गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments