Homeराज्यउजळाईवाडीत क्रांती तरुण मंडळाच्यावतीने क्रांती दिन साजरा…रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी…

उजळाईवाडीत क्रांती तरुण मंडळाच्यावतीने क्रांती दिन साजरा…रक्तदान शिबीर व नेत्र तपासणी…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

उजळाईवाडी (ता. करवीर) येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त येथील क्रांती तरुण मंडळाच्या वतीने विविध उपक्रमानी क्रांती दिन साजरा करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्या क्रांतिकारांना वंदन करून ध्वज वंदन करण्यात आले.

या दरम्यान क्रांती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वैभवलक्ष्मी ब्लड बँकेमार्फत  रक्तदान केले.साई हॉस्पिटलच्या योगी डांगे यांच्या मार्फत  जेष्ठ नागरिकांची  मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोहन सातपुते यांच्या  वतीने मोफत रक्त तपासणी, एड्स जनजागृती करण्यात आली.युवकांनी फळे वाटप केली. क्रांतीचा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला.

या कार्यक्रमास क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजानिस ग्रामपंचायत उपसरपंच उज्ज्वला केसरकर, माजी सरपंच राजेंद्र माने, नायकू बागणे, बुलगाणीन कांबळे,ग्रामसेवक दत्तात्रय धनगर, शिवाजी माने, मोहन सातपुते,लक्षण केसरकर याच्यासह युवक मोट्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments