HomeMarathi News TodayKunal Kamra | कुणाल कामरा यांनी विश्व हिंदू परिषदेला लिहलं पत्र…दिलं हे...

Kunal Kamra | कुणाल कामरा यांनी विश्व हिंदू परिषदेला लिहलं पत्र…दिलं हे चॅलेंज…

Kunal Kamra | उजव्या विचारसरणीच्या धमक्यांमुळे गुरुग्राममधील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर काही दिवसांनी, ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा Kunal Kamra याने रविवारी विश्व हिंदू परिषदेला (व्हीएचपी) एक खुले पत्र लिहून महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा निषेध करण्याचे आव्हान केले.

कॉमेडियन कामरा, ज्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली होती, त्यांनी स्वत: ला VHP सोबत तुलना करत “मोठा हिंदू” घोषित केले आहे आणि म्हटले आहे की तो धमकी देऊन आपली उपजीविका करत नाही.

कामरा यांनी व्हीएचपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर टॅग केलेल्या पत्रात लिहिले, ‘मी जय श्री सीता-राम आणि जय राधा-कृष्ण मोठ्याने आणि अभिमानाने म्हणतो. आता जर तुम्ही खरच भारताचे लेकरू असाल तर गोडसे मुर्दाबाद लिहून पाठवा. नाहीतर मला वाटेल की तुम्ही लोक हिंदुविरोधी आणि दहशतवादी आहात.’

त्यांनी पत्रात लिहिले की, ‘मला सांगा की तुम्ही गोडसेला देव मानता? तुम्ही सहमत असाल तर भविष्यातही माझे शो रद्द करत राहा. तुमच्यापेक्षा जास्त हिंदू असण्याची परीक्षा मी जिंकली याचा मला आनंद होईल.’

कामरा म्हणाले की, ‘मी काहीही करेन, मी माझ्या कष्टाची भाकरच खाईन कारण तुमच्यापेक्षा मोठा हिंदू असल्याने मला वाटते की कोणाला धमकावून तुकडे खाणे हे पाप आहे.’ आपल्या पत्रात कामरा यांनी उजव्या विचारसरणीच्या संघटनांना त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडविल्या जात असल्याचे पुरावे मागितले आहे.

कामरा 17 आणि 18 सप्टेंबर रोजी स्टुडिओ एक्सओ बार, सेक्टर-29, गुरुग्राम येथे शो सादर करणार होता. हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांमार्फत उपायुक्त निशांतकुमार यादव यांना निवेदन देण्यात आली. हिंदू उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या सदस्यांनी सांगितले की, शो रद्द केला नाही तर ते विरोध करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments