HomeCrimeअमरावतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात...AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी शांत राहण्याचे केले...

अमरावतीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात…AIMIM नेते इम्तियाज जलील यांनी शांत राहण्याचे केले आवाहन..

भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आज देशभरात व राज्यातही उमटले. औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूरहसह अनेक ठिकाणी मुस्लिम संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तर आधीच संवेदशील असलेल्या अमरावती मध्ये काही अघटीत घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरातील चित्रा चौकात तैनात करण्यात आला आहे.

अमरावती पोलीस आयुक्त आरतीसिंग यांनी खबरदारी म्हणून शहरातील काही मुस्लीमबहुल भागात SRPF च्या तुकड्या तैनात केल्या आहेत.

शर्मा आणि जिंदाल यांना अटक करण्याची मागणी करीत आज औरंगाबादमध्ये सर्व मुस्लिम संघटना, पक्षाकडून विभागीय आयुक्त कार्यालयवर मोर्चा काढण्यात आला. दुपारची नमाज अदा झाल्यानंतर मोठा जमाव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे वळाला. शर्माच्या व्यक्तव्याचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली.

जेथेही आंदोलन होत असेल तेथे शांतता राखा आणि इस्लाम समाज शांतताप्रिय आहे हे दाखवून द्या असे आवाहन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments