Homeराज्यस्व. देवकीबाई बंग विद्यालयाची वृषाली वानखेडे हिंगणा तालुक्यात प्रथम...

स्व. देवकीबाई बंग विद्यालयाची वृषाली वानखेडे हिंगणा तालुक्यात प्रथम…

(१७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर ६४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत )

नागपूर – शरद नागदेवे

हिगंणा-माध्यमिक शालांत परीक्षेच्या घोषित झालेल्या स्थानिक हिंगणा येथील स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयाची वृषाली विलास वानखेडे ही विद्यार्थिनी 95.80 टक्के गुणांसह हिंगणा तालुक्यात प्रथम आली.

तर समीक्षा सुनील गजभिये व संजना प्रवीण आदमने हे दोन्ही विद्यार्थ्यांनी 94.80 टक्के गुणांसह विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तर विद्यालयातून तृतीय स्थानी आर्या दिलीपकुमार रेवतकर 94.40 टक्के गुण घेतले. तर युती हुमणे 94 टक्के,निकिता बारेवार 93 टक्के,प्रियंका येलुरे 92.80टक्के,

रश्मी ठोंबरे 91.80टक्के,श्रावणी खोडे 91.40,ऋतुजा तामगाडगे 91.20टक्के,वेदांती भिवापुरे 91.20टक्के,केशरी चर्जन 91.20टक्के,पूजा कावळे 91टक्के,नवनीत प्रधान 90.80 टक्के, रिया पांडे 90.20टक्के,सृष्टी भांडारकर 90.00टक्के,नंदिनी भोयर 90 टक्के गुण घेऊन एकूण 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी स्थान मिळविले.

विद्यालयातील एसएससी च्या विद्यार्थ्यांनी मागील अकरा वर्षांपासून विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयातून एसएससी च्या परीक्षेत एकूण 116 विद्यार्थी बसले. त्यापैकी 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत तर 64 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, व बत्तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, नागपुर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, संस्थेचे संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य नितीन तुपेकर, पर्यावेक्षक अतुल कटरे, नितीन लोहोकरे, दीपक कनेरकर, उमेश लोणारे, सोनम लारोकर, व सुषमा भलावी यांचेसह पालकांना दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments